दिवसाला केवळ 63 रुपये भरा आणि 7 लाख मिळवा, LIC ची खास योजना नेमकी काय?

खास म्हणजे कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही योजना अतिशय फायद्याची आहे. एलआयसी जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy ) असं या विशेष योजनेचं नाव आहे.

दिवसाला केवळ 63 रुपये भरा आणि 7 लाख मिळवा, LIC ची खास योजना नेमकी काय?

नवी दिल्ली : तुम्ही एलआयसी (LIC) पॉलिसी घेण्याबद्दल विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. यामध्ये दररोज फक्त 63 रुपये द्यावे लागणार आहेत. खास म्हणजे कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही योजना अतिशय फायद्याची आहे. एलआयसी जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy ) असं या विशेष योजनेचं नाव आहे.  (invest 63 rupees in lic jeevan anand policy daily and get 7 lakh rupees)

काय आहेत पॉलिसीची वैशिष्ट्ये
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 26 वर्ष असली पाहिजे.

– या योजनेमध्ये 25 वर्षांच्या कालावधीत परतावा मिळतो.

– ही पॉलिसी बोनस सुविधा, तरलता आणि गुंतवणूकीच्या बाबतीत सर्वोत्तम मानली जाते.

– या पॉलिसीनुसार संबंधित व्यक्तीला किमान 1 लाख रुपये मिळण्याची हमी आहे. तर कमाल रक्कमेसाठी कोणतीही मर्याद नाही.

– याशिवाय गुंतवणूकदारांना रिस्क कव्हरदेखील मिळतो.

– या पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विमा असे दोन्ही फायदे मिळतात.

पॉलिसीची मुदत
जीवन आनंद पॉलिसीसाठी 15 ते 35 वर्ष मुदत ठरवण्यात आली आहे. इतकंच नाही तर ही पॉलिसी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइनही उघडू शकता.

प्रीमियम भरणं
या पॉलिसीसाठी वार्षिक, 6 महिने, तिमाही आणि मासिक आधारावर प्रीमियम भरता येतो. पॉलिसी खरेदीच्या 3 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या पॉलिसीवर कर्जही घेऊ शकता.

– वय : 26

– मुदत : 20

– डीएबी : 400000

– मृत्यूची विमा रक्कम : 500000

– बेसिक विमाराशी : 400000

प्रथम वर्षाचा प्रीमियम टॅक्ससोबत 4.5%
वार्षिक: 23857 (22830 + 1027)
अर्धवार्षिक: 12052 (11533 + 519)
त्रैमासिक: 6087 (5825 + 262)
मासिक: 2029 (1942 + 87)

कसे मिळणार 7 लाख रुपये
समजा जर एखाद्या व्यक्तिने 26 व्या वयात 20 वर्षांच्या टर्म प्लानमध्ये गुंतवणूक केली आणि यासोबत तो 400000 रुपयांची निर्धारीत रक्कम निवडतो. अशात पहिल्या वर्षी 23344 रुपयांचा प्रीमियम द्वावा लागेल. म्हणजेच दरमहा 65 रुपये द्यावे लागतील.

यानंतर, दुसर्‍या वर्षापासून पॉलिसीमध्ये प्रीमियम कमी होईल. कारण, यावेळी कर दर 2.25% असेल. म्हणजेच तुम्हाला दर वर्षाला 23344 रुपये आणि दररोज 63 रुपये गुंतवावे लागतील. हा प्रीमियम तुम्हाला 20 वर्षांसाठी भरावा लागेल. यामध्ये मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 764000 रुपये मिळतील.

इतर बातम्या – 

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता ‘या’ महिन्यापासून मिळण्याची शक्यता

दिवाळीनंतरही सलग 4 दिवस बंद राहणार बँक, वाचा कोणत्या आहेत तारखा?

(invest 63 rupees in lic jeevan anand policy daily and get 7 lakh rupees)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI