फार्मा कंपनीचे स्टॉक पळणार सुसाट, करा गुंतवणूक व्हा मालामाल! 

फार्मा कंपनीचे स्टॉक पळणार सुसाट, करा गुंतवणूक व्हा मालामाल! 
शेअर मार्केट

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जग हादरले असेल आणि अनेक उद्योगांना कोविडने हादरवून सोडले असेल तरी औषधी निर्माण कंपन्यांनी सर्वात जास्त प्रगती केली आहे. शेअर मार्केटमध्ये फार्मा सेक्टरने सर्वाधिक तेजी नोंदवली आहे. या सेक्टरमधील अनेक कंपन्यांनी चांगली प्रगती साधली असून अपेक्षेपेक्षाही जास्त परतावा दिला आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 30, 2021 | 9:25 AM

कोविड-19 काळात तुमच्या शहरात, परिसरात किती मेडिकल, मेडिकल चेन्सची दुकानं उघडली हे तुमच्या सहज लक्षात आले असेल. पुर्वी डॉक्टर शेजारी मेडिकल अशी असणारी संकल्पना मोडित निघाली असून मोक्याच्या ठिकाणावर मेडिकल ही संकल्पना रुजली आहे. एका रस्त्यावर पूर्वी दोन मेडिकल होती. आता हीच संख्या वाढली आहे. त्यामुळे मेडिकल लाईनला चांगले दिवस आले आहेत. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढली आहे. त्याचा अनुकूल परिणाम शेअर मार्केटमधील फार्मा सेक्टरमध्येही दिसून येत आहे. काही ब्रोकर्स हाऊसने फार्मा सेक्टरमधील या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परतावा मिळण्याचा सल्ला दिला आहे.

केडिला हेल्थकेअर- 53 टक्के परताव्याचा अंदाज

शेअरखान या ब्रोकर्सने केडिला हेल्थकेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्या कंपनीचा शेअर 470 वर असून हा शेअर 720 अंकाचे लक्ष सहज गाठेल असा आशावाद ब्रोकर्सने व्यक्त केला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये तब्बल 53 टक्क्यांचा परतावा मिळणार आहे. कंपनी कंझ्युमर वेलनेसमध्ये जोरदार मुसंडी मारत असून ती तेजीत असल्याचे शेअरखानने स्पष्ट केले आहे. केडिलाच्या कोविड पोर्टफोलियोत व्हॅक्सीनपासून औषधांचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात या कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या नवीन उत्पादनांमुळे भविष्यात कंपनीला जबरदस्त फायदा होण्याची शक्यता शेअरखानने व्यक्त केली आहे.

एमी ऑर्गेनिक्स- 28 टक्के परतावा मिळण्याची शक्यता

ब्रोकिंग फर्म आनंद राठी यांनी एमी ऑर्गेनिक्समध्ये 1354 लक्ष्य निर्धारित करुन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्या कंपनीचा शेअर 1059 वर असून गुंतवणूक केल्यास 28 टक्क्यांच्या परताव्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. एमी ऑर्गेनिक्स विशेष रसायन तयार करणारी कंपनी आहे. कंपनी एपीआई आणि फार्मा इंटरमीडियेट्स तयार करणारी प्रमुख कंपनी आहे. ब्रोकिंग फर्मच्या अंदाजानुसार, कंपनी सध्या मजबूत स्थितीत आहे.

एरीस लाईफ सायन्स- 18 टक्क्यांचा परतावा 

मोतीलाल ओसवाल ब्रोकर्सने एरीस लाईफ सायन्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्या शेअर 737 अंकावर असून तो 870 चे लक्ष्य गाठू शकतो. या कंपनीच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांचा परतावा मिळण्याचा अंदाज आहे. कोणत्याही मोठ्या बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा हा परतावा नक्कीच तिप्पट आहे. ब्रोकिंग फर्मच्या दाव्यानुसार, कंपनी क्रोनिक श्रेणीत सर्वाधिक गतीने वाढ नोंदवत आहे. ब्रोकिंग कंपनीच्या दाव्यानुसार येत्या काळात कंपनीची घौडदौड सुरुच राहू शकते.

(ब्रोकिंग फर्मच्या सल्ल्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे. बाजारात गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणुकीपूर्वी अभ्यास करुन आणि माहिती घेऊनच शेअर खरेदी करावेत.)

संबंधित बातम्या : 

नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट: थकित रक्कम लवकरच वर्ग, महागाई भत्त्यांत वाढ!

Mutual Fund | म्युच्युअल फंड: महिन्याला हजार गुंतवा, 20 वर्षांत लखपती व्हा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें