इंडसइंड बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल, हे आहेत नवीन दर

बँकेने मुदतपूर्व रक्कम काढणे आणि रक्कम न काढणे या दोन्ही प्रकारांसाठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या मुदत ठेवीच्या दरांमध्ये बदल केला आहे

इंडसइंड बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल, हे आहेत नवीन दर
file photoImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 10:55 AM

खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने (IndusInd Bank) होळीपूर्वी ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात ( FD Rates) बदल केला आहे. बल्क फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात हा बदल करण्यात आला आहे. बँकेने प्री-मॅच्युअर विथड्रॉवल आणि नॉन-विथड्रॉवल या दोन्ही प्रकारांसाठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या मुदत ठेवींचे दर बदलले आहेत. आतापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया , एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि कॅनरा बँक या प्रमुख बँकांनी बल्क डिपॉझिटवरील एफडी दरात (revises interest rates) बदल केला आहे. इंडसइंडचे नवे दर 14 मार्च 2022 पासून लागू झाले आहेत.इंडसइंड बँक 10 कोटी ते 100 कोटी रुपयांच्या ठेवींवर 61 महिन्यांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 4.9 टक्के व्याज देत आहे. याच कालावधीत पाच कोटी ते साडेपाच कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4.8 टक्के व्याज दिले जात आहे.

त्याचबरोबर बँक 61 महिन्यांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत 10 ते 100 कोटी रुपयांमधील रक्कमेवर 4.9 टक्के व्याज देत आहे. याच कालावधीसाठी 5 ते 5.5 कोटी रुपयांसाठी आणि 5.75 ते 10 कोटी रुपयांसाठी जमा केलेल्या रक्कमेवर 4.8 टक्के व्याज बँक देणार आहे. तर 5.50 कोटी ते 5.75 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवर 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीवर 4.25 टक्के व्याज देत आहे. याव्यतिरिक्त, 7 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी व्याज दर 3.1-3.5 टक्के असेल. मात्र, या ठेवींचे मूल्यदर हे बँकेने इतर काळात व अन्य ठेवींमध्ये देऊ केलेल्या एफडी व्याजदरापेक्षा अत्यंत कमी आहेत.

एफडी व्याजदर 5.5 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या ठेवींवरील दर वगळता, इंडसइंडमधील एफडीचे दर 1 वर्षापेक्षा जास्त आणि 61 महिन्यांपेक्षा कमी कालावधीवर 4.7 टक्क्यांपासून 4.85 टक्क्यांपर्यंत आहेत. दरम्यान, 7 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीवरील दर 3.1 टक्क्यांवरून 4.75 टक्क्यांवर होते. हे दर इंडसइंडमधील पैसे काढण्यायोग्य मुतद ठेवीला लागू होते. मात्र, पैसे न काढण्याच्या मुदत ठेवीसाठी पाच कोटी रुपयांपासून ते शंभर कोटी रुपयांपर्यंत सुरू होणाऱ्या ठेवींचा व्याजदर 3.1 टक्क्यांपासून कमाल 5 टक्क्यांपर्यंत असणार आहे.

मुदतपूर्व पैसे काढल्यास व्याज नाही ग्राहकांनी येथे एक बाब लक्षात ठेवावी की, प्री-मॅच्युअर विथड्रॉवलमध्ये घरगुती आणि एनआरओ मुदत ठेवींसाठी किमान कालावधी 7 दिवसांचा आहे आणि ठेवीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत अकाली काढलेल्या ठेवीसाठी कोणतेही व्याज देय नाही. दरम्यान, एनआरई मुदत ठेवीसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे आणि या कालावधीत मुदतपूर्व काढलेल्या ठेवींवर कोणतेही व्याज देय नाही. याशिवाय मुदतपूर्व पैसे काढण्यावर 1 टक्क्यापर्यंत दंडात्मक व्याज आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर पैसे न काढण्याच्या मुदत ठेवीअंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळणार नाही म्हणजेच अशा ठेवीची मुदत संपण्यापूर्वी ठेवीदाराला मुदत ठेव बंद करता येणार नाही.

Hijab Ban : कर्नाटकमधल्या हिजाब बंदीवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब, हिजाब धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा

प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा

किस्सा नहीं, कहानी बन गई; शेततळ्यांवरील व्हिडीओसाठी फेमस, अमरावतीच्या जोडगोळीचा बुडून मृत्यू

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.