Bond Investment : गुंतवणुकीचे पर्याय अनेक, बाँड-शेअरमध्ये नेमका फरक काय? फायद्याचे गणित तर समजून घ्या

Bond Investment : बाँड की शेअर, गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरणार उत्तम?

Bond Investment : गुंतवणुकीचे पर्याय अनेक, बाँड-शेअरमध्ये नेमका फरक काय? फायद्याचे गणित तर समजून घ्या
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 10:20 PM

नवी दिल्ली : गुंतवणुकीचे आता अनेक पर्याय (Investment Options) आहेत. पारंपारिक पर्यांयासोबतच आता बदलत्या जगाचा पासवर्डही गुंतवणूकदार आत्मसात करत आहेत. एफडी (FD), आरडी (RD), पीपीएफ, किसान विकास पत्र आणि अनेक जुन्या योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओढा आहे. पण आता शेअर बाजारात, बाँडमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. आता बाँड (Bond)आणि शेअरमध्ये (Share) नेमका फरक काय असतो, त्यातील गुंतवणुकीतून काय फायदा होतो, याविषयी गुंतवणूकदार सातत्याने माहिती घेत असतो. कशात अधिक फायदा होतो, याविषयीची जिज्ञासा अनेक गुंतवणूकदारांच्या मनात असते. या गुंतवणुकीतील फायदे तोटे आता पाहुयात.

भारतातील अनेक गुंतवणूक पर्यांयापैकी बाँड हा एक पर्याय आहे. बाँडला कर्ज साधन (Debt Instrument) असे म्हणतात. या पर्यायात बाँड काढणारी कंपनी बाँडधारकाकडून पैसे उधार घेते. अर्थात या कंपनीला बाँडच्या रुपात बाँडधारक गुंतवणूक करतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर कंपनी बाँडधारकाला व्याज देते.

बाँडमध्ये कंपनी आणि गुंतवणूकदारामध्ये प्रत्यक्ष करार होतो. कंपनीला गुंतवणूकदार उधार देतो. त्यावर कंपनी त्याला व्याज देते. हे व्याज मासिक, सहामाही, वार्षिक वा ठराविक कालावधीसाठी देण्यात येते. निश्चित कालावधीनंतर रक्कम सव्याज परत होते.

हे सुद्धा वाचा

बाँड आणि शेअर हे दोन्ही भांडवली बाजार रोखे (Capital market securities) आहेत. शेअरधारकाची कंपनीत इक्विटी हिस्सेदारी असते. तर बाँडधारक कंपनीत धनको (Creditor stake) असतो. त्याची कंपनीत हिस्सेदारी असते.

बाँडमध्ये सर्वसाधारणपणे व्याजदर हे अगोदरच निश्चित असतात. एका ठराविक कालावधीत बाँडमध्ये परिपक्वता येते. तर शेअर बाजारातील स्टॉकमध्ये अनिश्चित काळ असतो. गुंतवणुकीवर नफा मिळाला की गुंतवणूकदार बाहेर पडू शकतो.

मोठा उद्योगसमूह अथवा सरकार दीर्घकालीन गुंतवणूक अथवा सध्याचा खर्च भागविण्यासाठी मोठा निधी उभारते. त्यासाठी बाँड जारी करण्यात येतात. कमी जोखीम असल्याने बाँडमधील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. परंतु, शेअर बाजारातील गुंतवणूक तेवढीच जोखमीची आणि भरमसाठ परतावा देणारी मानण्यात येते.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.