तुमच्या एसबीआय शाखेत पासबुक प्रिंट मशीनमध्ये गडबड आहे? मग अशी करा तक्रार

बँक कर्मचाऱ्यांकडून अनेकदा माहिती दिली जाते की, मशीन बिघाडामुळे पासबुक प्रिंटची सुविधा दिली जात नाही. अनेक बँकांमध्ये स्वयंचलित पासबुक प्रिंटिंग मशीन बसवण्यात आलीत, जिथून तुम्ही तुमचे पासबुक छापू शकता.

तुमच्या एसबीआय शाखेत पासबुक प्रिंट मशीनमध्ये गडबड आहे? मग अशी करा तक्रार
स्टेट बँक ऑफ इंडिया
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 8:06 AM

नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडिया आता ऑनलाईन माध्यमातून आपल्या ग्राहकांना अनेक सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आताही तुम्ही बँकेतून घेतलेल्या अर्जाच्या फॉर्मद्वारे तुमचे बँक खाते उघडू शकता. माहितीच्या अभावामुळे अनेक लोक बँकेच्या शाखेला भेट देतात, ज्यामध्ये पासबुक छापून घेणाऱ्यांची संख्याही मोठी असते. मात्र, पासबुक प्रिंटिंग मशीन बँकेत चालू नसल्याची तक्रार हे लोक अनेकदा करतात.

तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तुमचे स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता

बँक कर्मचाऱ्यांकडून अनेकदा माहिती दिली जाते की, मशीन बिघाडामुळे पासबुक प्रिंटची सुविधा दिली जात नाही. अनेक बँकांमध्ये स्वयंचलित पासबुक प्रिंटिंग मशीन बसवण्यात आलीत, जिथून तुम्ही तुमचे पासबुक छापू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तुमचे स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून स्टेटमेंट घेता येत नसेल आणि पासबुक प्रिंटिंग मशीन सदोष असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

पासबुक प्रिंटिंग मशीन बिघडल्यास काय करावे?

जर तुमच्या बँकेत पासबुक प्रिंटिंग मशीनदेखील खराब असेल, तर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. यानंतर बँकेकडून समस्या सोडवली जाईल. जर तुम्हाला पासबुक प्रिंटिंग मशीनबद्दल तक्रार करायची असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करू शकता. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘कृपया आपली तक्रार दिलेल्या लिंकमध्ये दिलेल्या https://crcf.sbi.co.in/ccf/ Under category of Existing Customer (MSME/Agri Loans/Other Grievances ) / under General Banking >> Passbook Related >> Denial/ Difficulties in Passbook updation वर करा.

तुम्ही आमच्या ऑनलाईन बँकिंग सेवांचा लाभदेखील घेऊ शकता

तसेच बँक म्हणते की, तुम्ही आमच्या ऑनलाईन बँकिंग सेवांचा लाभदेखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही तुमचे व्यवहार तुमच्या घरी पाहू शकाल. ऑनलाईनद्वारे स्टेटमेंट डाऊनलोड करणे आणखी सोपे आहे.

पासबुकवर शुल्क आहे का?

बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा पहिले पासबुक बँकेकडून दिले जाते, त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पहिले पासबुक तुम्हाला मोफत दिले जाते. यानंतर जर तुम्ही दुसरे पासबुक बनवले असेल, तर तुम्हाला 100 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. तसेच प्रति पृष्ठ 50 रुपये जीएसटी (40 नोंदी) देखील आकारले जातात. अशा परिस्थितीत आजकाल अधिक पासबुक छापण्यासाठीही शुल्क आकारले जात आहे.

संबंधित बातम्या

पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु ‘या’ लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी

तुमचे आधार कार्ड बनावट आहे का?, तात्काळ ऑनलाईन चेक करा

Is there a glitch in your passbook print machine at your SBI branch? Then complain like this

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.