AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Gold : ग्राहकांना झटका, ऐन सणासुदीत सोने-चांदीची भारारी, दोन दिवसांत इतक्या वधारल्या किंमती

Jalgaon Sarafa Market : जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने दुसऱ्या दिवशी पण दंगा केला. सोने-चांदीच्या या घौडदौडीमुळे सुवर्णनगरीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसला. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. काय आहेत आता किंमती?

Jalgaon Gold : ग्राहकांना झटका, ऐन सणासुदीत सोने-चांदीची भारारी, दोन दिवसांत इतक्या वधारल्या किंमती
जळगावमध्ये सोने आणि चांदी सुसाट
| Edited By: | Updated on: Sep 15, 2024 | 9:49 AM
Share

जळगाव, सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या दमदार बॅटिंगमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. शुक्रवारनंतर शनिवारी पण दोन्ही धातूच्या किंमतीत सलग वाढ नोंदविण्यात आली. सोने-चांदीच्या या घौडदौडीमुळे सुवर्णनगरीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसला. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली.जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ कायम होती.

असा वधारला भाव

शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच डळमळत असल्याने बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यास सुवर्ण व्यवसायिकाचं म्हणणं आहे. या दरवाढीमुळे चांदी पावणे दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे

१४ ते २४ कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७३,०४४, २३ कॅरेट ७२,७५२, २२ कॅरेट सोने ६६,९०८ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५४,७८३ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,७३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८६,१११ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.