कोरोनाकाळात नोकरी गेली, एनआरआयने बनविला मशरुमच्या अर्कापासून नवा कॉफी ब्रॅंड

कोरोनाकाळात नोकरी गेल्याने केरळला परतल्यावर त्यांनी मशरुमची शेती सुरु केली. परंतू त्यात जास्त फायदा नव्हता. अखेर मशरूमपासून पौष्टीक कॉफी बनविण्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली...

कोरोनाकाळात नोकरी गेली, एनआरआयने बनविला मशरुमच्या अर्कापासून नवा कॉफी ब्रॅंड
LALU THOMASImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 6:01 PM

मुंबई : कोरोनाकाळात अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. त्यातून अनेकांना घरी रिकामे न बसता नवनवीन संकल्पना वापरून बिझनसच्या नव्या आयडीया शोधून काढल्या आहेत. अशाच प्रकारे अनिवासीय भारतीय असलेल्या ( NRI ) लालू थॉमस यांची नोकरी कोविड काळात गेली. त्यांनी हार न मानता सरळ शेती सुरू केली, परंतू त्यांना काही तरी वेगळे करायचं होतं. त्यानंतर La Bae या नव्या कॉफी ब्रॅंडचा शोध लागला. जाणूया त्यांची सक्सेस स्टोरी…

कोविड-19 जागतिक साथी दरम्यान आपल्याला स्वच्छता आणि सकस तसेच पौष्टीक अन्नाचे महत्व पटले. हेल्थ प्रोडक्टची वाढती मागणी पाहून त्यांनी काही तरी पौष्टीक घटक असलेला पदार्थ तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कळले की मशरूमची भाजी शरीराला खूपच फायदेशीर आणि ताकद देणारी आहे. मशरूममध्ये फायबर आणि अ‍ॅण्टीऑक्सीडेंट भरपूर आहेत. मशरुममध्ये इतर भाज्यापेक्षा अधिक खनिज आहेत. त्यामुळे त्यांनी मशरुमच्या अर्कापासून कॉफी बनविण्याचा निर्णय घेतला. सदानंदपुरम येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने मशरुमपासून कॉफीचा नवा La Bae हा ब्रॅंड विकसित करण्यात आला. मशरुम कॉफीच्या पोषण मूल्य आणि शेल्फ लाईफचे मूल्यांकन खाद्य संशोधन आणि विकास परिषद (CFRD) आणि काजू निर्यात संवर्धन परिषद (CEPCI ) यांच्या लॅब मार्फत करण्यात आले.

सौदीतील शेफची नोकरी गेली

संयुक्त अरब अमिरातीत शेफ म्हणून काम करणाऱ्या लालू थॉमस यांच्या डोक्यात स्टार्टअप सुरू करण्याचा कधीच विचार नव्हता आला. परंतू त्यांना एक पौष्टीक फूड तयार करण्याची इच्छा होती. जेव्हा त्यांनी सौदीत पंधरा वर्षे पूर्ण केली, तेव्हा 45 वर्षांनंतर घराची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्यांना कोल्लम येथील आपल्या गावी जाऊन शेती करावी अशी त्यांची इच्छा होती. साल 2019 मध्ये कोविड मुळे त्यांची नोकरी गेली तेव्हा त्यांची गावी परतण्याची इच्छा पूर्ण झाली.

आणि मशरुमची शेती सुरु केली

केरळला परतल्यावर त्यांनी मशरुमची शेती सुरु केली. परंतू त्यात जास्त फायदा नव्हता. त्यानंतर ते कोल्लम कृषि विज्ञान केंद्रात गेले, आणि त्यांना संशोधनात मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर मशरुम फ्लेवर्ड कॉफीचा शोध लागला. दोन वर्षांनंतर त्यांना कॉफी आणि मशरुमचे किती प्रमाण एकत्र करायचे याचा अंदाज आला. रेशो समजल्यानंतर कॉफीच्या पाकिटात 70 टक्के मशरुम आणि 30 टक्के कॉफी पावडर असते. त्यानंतर या मिश्रणात 100 टक्के अरेबिका कॉफी मिसळण्यात आली. लालू थॉमस त्यांच्या शेतातील मशरुम घेतातच आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहूनही ते मशरुम विकत घेतात. थॉमस यांच्याकडे कॉफीची झाडे नाहीत. त्यामुळे वायनाडवरून कॉफी घेतात, आता ते या ब्रॅंडला लोकल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरविणार आहेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.