AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Adani Group : दोस्तीने लावला चूना! एलआयसीला एकाच दिवसात इतक्या कोटींचा फटका

LIC Adani Group : हिंडनबर्ग रिपोर्टनंतर OCCRP च्या दारुगोळ्यामुळे अदानी समूहाला मोठे भगदाड पडले आहे. भारतीय आर्युविमा महामंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या सरकारी विमा कंपनीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. एका दिवसातच अदानी समूहाचे अनेक शेअर गडगडले आहे. त्यामुळे एलआयसीला पण फटका बसला.

LIC Adani Group : दोस्तीने लावला चूना! एलआयसीला एकाच दिवसात इतक्या कोटींचा फटका
| Updated on: Sep 01, 2023 | 2:08 PM
Share

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : अमेरिकेच्या दोन फर्म अदानी समूहाच्या चांगल्याच मानगुटीवर बसल्या आहेत. यापूर्वी हिंडनबर्ग रिपोर्ट आणि आता OCCRP च्या रिपोर्टने अदानी समूहाला मोठा फटका दिला. अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि पार्ट-टू-एनर्जीविरोधात OCCRP ने गंभीर आरोप केले आहेत. काल विरोधी पक्षांनी मुंबईत तोच धागा पकडून विरोधाचा सूर आळवला. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. अदानी समूहातील अनेक शेअर्स या घडामोडींमुळे गडगडले. त्याचा फटका भारतीय आर्युविमा महामंडळाला (Life Insurance Company of India-LIC) पण बसला. सरकारी विमा कंपनीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांच्या बाजार भांडवल घसरल्याने एलआयसीचे नुकसान झाले. त्यांच्या शेअरचे मूल्य पण घसरले.

अदानी समूहात घसरणीचे सत्र

  1. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये अदानी इंटरप्राईजेसचे शेअर 3.51 टक्क्यांनी घसरुन बंद झाला.
  2. अदानी टोटल गॅसचा शेअर 2.24 टक्क्यांसह बंद झाला.
  3. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर 3.53 टक्के घसरला
  4. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरची किंमत 3.76 टक्के घसरुन बंद झाला.
  5. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकोनॉमिक शेअर 3.18 टक्के खाली आला.
  6. एसीसी कंपनीचा शेअर 0.73 टक्क्यांनी घसरला.
  7. अंबुजा सिमेट्सचा शेअर 3.66 टक्क्यांनी खाली आला.
  8. एनडीटीव्हीचा शेअर 1.92 टक्क्यांनी पडला.
  9. अदानी पॉवर कंपनीचा शेअर 1.93 टक्क्यांनी घसला.
  10. अदानी विल्मरचा शेअर 2.70 टक्क्यांनी खाली आपटला.

किती बसला फटका?

गुरुवारी अदानी समूहाला 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक्सचेंजच्या आकड्यानुसार, 30 ऑगस्ट 2023 रोजी अदानी समूहातील सर्व 10 शेअरमध्ये घसरण झाली. बाजारातील एकूण भांडवल 10.84 लाख कोटी रुपयांनी घसरले. तर 31 ऑगस्ट रोजी हे नुकसान 10.49 लाख कोटी रुपयांवर पोहचले. एकाच दिवसात अदानी समूहात जवळपास 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

एलआयसी बसला इतका फटका

35,000 कोटी रुपयांच्या या नुकसानीत एलआयसी पण एकाच सत्रात 1,439.8 कोटी रुपयांचा वाटा आहे. एलआयसीला इतका फटका बसला आहे. LIC ने अदानी समूहातील सहा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. डाटानुसार, 30 जून रोजी एलआयसीकडे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिकमध्ये 9.12 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 4.26 टक्के, अदानी टोटल गॅस, एससीसी आणि अंबुजा सिमेंट्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे.

काय आहे आरोप

जगातील दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) अदानी समूहावर गंभीर आरोप लावले आहेत. फर्मच्या दाव्यानुसार, अदानी कुटुंबियांच्या भागीदारांनी शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ऑफ शोर’ म्हणजे Opaque फंडचा वापर केला. म्हणजे कुटुंबियांनीच बाहेरुन गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.