LIC कंपनी झाली मालामाल, तुमच्याच पैशांनी कमावले तब्बल 15 हजार कोटी

कंपनीला मागच्या 6 महिन्यांमध्ये इंडियन शेअर मार्केटमध्ये तब्बल 50,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

LIC कंपनी झाली मालामाल, तुमच्याच पैशांनी कमावले तब्बल 15 हजार कोटी

नवी दिल्ली : देशातली सगळ्या मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Insurance Corporation) मागच्या 6 महिन्यांमध्ये विक्रमी नफा कमावला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोरोनाच्या संकटकाळात कंपनीला तब्बल 15 हजार कोटींचा फायदा झाला आहे. याव्यतिरिक्त 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे नफा आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला थेट 18,500 कोटी रुपयांचा नफा झाला होता. (lic earn profit of rs 15000 cr in covid pandemic)

मागच्या 6 महिन्यांत विक्रमी नफा LIC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मागितीनुसार, कंपनीला मागच्या 6 महिन्यांमध्ये इंडियन शेअर मार्केटमध्ये तब्बल 50,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्यामध्ये बाजार घसरल्याचं पाहायला मिळालं पण कंपनीने जशी इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवली तशी आज LIC कंपनी आज 15 हजार कोटी रुपयांच्या फायद्यामध्ये आहे.

पुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

मार्च महिन्यात मोठी गुंतवणूक इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्यात मार्केट कोसळलं असताना कंपनीने गुंतवणूक केली आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या 6 महिन्यांत इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बाँड्स आणि राज्य विकास कर्जांमध्ये 2.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इतकंच नाही तर कंपनीने 2 लाख कोटी रुपयांची आणखी एक गुंतवणूक योजना तयार केली आहे.

किती वाढले कंपनीचे मुल्य? खरंतर, 30 जून 2020 पर्यंत भारतीय शेअर बाजार कंपनीचं मुल्य ( value) 5.34 लाख कोटी रुपये होतं. पण आता झालेल्या फायद्यामुळे 31 मार्च 2020 ला कंपनीची व्यल्हू 4.51 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

51 कंपन्यांमध्ये वाढवली भागिदारी कंपनीने गेल्या तिमाहीत 51 कंपन्यांमध्ये आपली भागिदारी वाढवली आहे. त्याचबरोबर 30 कंपन्यांमध्ये पदं कमी केली तर 224 कंपन्यांच्या भांडवलात कोणताही बदल झालेला नाही.

(lic earn profit of rs 15000 cr in covid pandemic)

Published On - 11:00 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI