LICची दमदार पॉलिसी: फक्त 1302 रुपये मंथली प्रीमियमवर मिळतात 27.60 लाख रुपये!

एलआयसीची लोकप्रिय पॉलिसी जीवन उमंगची सध्या मोठी चर्चा आहे. या पॉलिसीची खास बाब ही आहे की, ही 3 महिन्याच्या बाळापासून ते 55 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते.

LICची दमदार पॉलिसी: फक्त 1302 रुपये मंथली प्रीमियमवर मिळतात 27.60 लाख रुपये!
एलआयसी

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओची गेल्या काही दिवसात जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रत्येकजण यात पैशांची गुंतवणूक करुन मोठ्या प्रमाणात कमाई करण्याची संधी शोधत आहे. मात्र तुम्ही LIC मधील काही खास योजनांमध्ये पैसे गुंतवून मोठी कमाई करु शकता. सोबतच तुमचं आणि तुमच्या परिवाराचं भविष्य सुरक्षित करु शकता. तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका खास प्लॅनबद्दल सांगत आहोत. (If you invest Rs 1302 per month in LIC’s Jeevan Umang policy, you will get Rs 27 lakh 60 thousand)

एलआयसीची लोकप्रिय पॉलिसी जीवन उमंगची सध्या मोठी चर्चा आहे. या पॉलिसीची खास बाब ही आहे की, ही 3 महिन्याच्या बाळापासून ते 55 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. खरं तर ही एक एंडोमेंट प्लॅन आहे. यात लाईफ कव्हरसोबत मॅच्योरिटीवर एक मोठी रक्कम मिळते. या योजनेची अजून एक खास बाब म्हणजे यात 100 वर्षापर्यंत कव्हर मिळतं.

अशी मिळेल 27.60 लाख रुपयांची रक्कम

एलआयसीच्या जीवन उमंग या पॉलिसीमध्ये एखादा व्यक्ती प्रत्येक महिन्याला 1302 रुपये प्रिमियम भरत असेल तर त्याचे एक वर्षाला 15 हजार 298 रुपये होतात. जर ही पॉलिसी 30 वर्षापर्यंत घेतली तर तुमची गुंतवणूक 4.58 लाख रुपये होते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर कंपनी 31 व्या वर्षापासून प्रत्येक वर्शाला 40 हजार रुपयांचा परतावा द्यायला सुरु करते. जर तुम्ही 31 वर्षापासून 100 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला 40 हजार रुपयांचा परतावा घ्याल तर तुम्हाला 27 लाख 60 हजार रुपयांची रक्कम मिळते.

अजून कोणते फायदे मिळतात?

जीवन उमंग पॉलिसीमध्ये तुम्हाला मोठ्या परताव्यासह काही रायडर बेनिफिट्सही मिळतात. जसं की पॉलिसीनुसार गुंतवणूकदाराची एखाद्या अपघातात मृत्यू होते किंवा अपंग झाल्यावर टर्म रायडर फायदा मिळेल. तसंच गुंतवणूक केलेल्या एकूण प्रीमियमवर 80 सी नुसार आयकरात सूट मिळते. यानुसार या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही पैसे तर मिळवूच शकता, सोबतच तुमच्या परिवाराचं भविष्यही सुरक्षित करु शकता. कारण, पॉलिसी चालू असताना पॉलिसी धारकाचा मृत्यू होतो तर पॉलिसीची सर्व रक्कम ही त्याच्या वारसाला मिळते.

संबंधित बातम्या :

LIC IPOसंदर्भात सरकार 3 दिवसांत घेणार दोन मोठे निर्णय, जाणून घ्या IPO कधी येणार?

RBI ने 24 तासांत घेतले दोन मोठे निर्णय; थेट सामान्य माणसावर होणार परिणाम

If you invest Rs 1302 per month in LIC’s Jeevan Umang policy, you will get Rs 27 lakh 60 thousand

Published On - 10:31 am, Fri, 16 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI