तर आर्थिक व्यवहारांना लागेल टाळे! दुप्पट भूर्दंड वाचवण्यासाठी असे जोडा पॅनकार्ड आधारसोबत

करदात्यांना पुढील वर्ष 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करण्याची मुभा देण्यात आली आहे. यादरम्यान त्यांना फक्त दंड भरावा लागेल. त्यानंतर दंडासोबतच पॅनकार्ड रद्द करण्यासारख्या कठोर निर्णयाला नागरिकांना सामोरे जावे लागेल.

तर आर्थिक व्यवहारांना लागेल टाळे! दुप्पट भूर्दंड वाचवण्यासाठी असे जोडा पॅनकार्ड आधारसोबत
असं जोडा आधार पॅनकार्डशीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 6:50 PM

परमनंट अकाऊंट क्रमांक  आणि आधार कार्ड लिंक (PAN-Aadhar Card Link) करण्याची अंतिम मुदत कधीचीच हातातून निसटून गेली आहे. याचा अर्थ असा नाही की, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय वा रद्द झाले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नसेल. त्यांचे पॅन कार्ड 31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय होणार आहे. परंतु, करदात्यांसाठी (Taxpayers) 30 जून 2022 पर्यंत पॅन कार्डला बायोमॅट्रिक आधारकार्डशी लिंक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सध्या 500 रुपये मोजावे लागणार आहे. 30 जून तारीख झाल्यानंतर दंडाची ही रक्कम दुप्पट अर्थात 1000 रुपये होईल. 29 मार्च 2022 रोजी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनेनुसार, करदात्यांना पुढील वर्ष 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करण्याची मुभा देण्यात आली आहे. यादरम्यान त्यांना फक्त दंड भरावा लागेल. त्यानंतर दंडासोबतच पॅनकार्ड रद्द करण्यासारख्या कठोर निर्णयाला नागरिकांना सामोरे जावे लागेल.

काय सांगतो नियम

प्राप्तिकर खात्याच्या अधिसूचनेनुसार, नियम 234 एच आणि सध्याचा नियम 114 एएए नियमांतर्गत ज्या व्यक्तींचे पॅनकार्ड बाद करण्यात आले आहे. त्यांना पॅन कार्ड क्रमांक द्यावा लागेल अथवा सूचित करावा लागेल. परंतू ही प्रक्रिया पूर्ण न करणा-या करदात्यांना आधार-पॅन लिंक करण्याबाबत जबाबदार धरण्यात येईल आणि पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल. दंडात्मक कार्यवाहीसाठी करदात्यांना नियम 114 च्या उपकलम 5 अ नुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

हे सुद्धा वाचा

तर होईल अशी कारवाई

संधी देऊनही पॅनकार्ड आणि आधार कार्ड न जोडल्यास पॅनकार्ड बाद होईल.नागरिकांना  कारवाईला सामोरे जावे लागेल. बँकेत खाते उघडण्यासाठी, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी, ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा सर्वाधिक वापर होतो. पण पॅनकार्ड बाद करण्यात आले तर पॅनकार्डशी संबंधित अथवा पॅनकार्ड आधारे जे काही व्यवहार होत असतील ते करता येणार नाहीत. कोणतेही वित्तीय व्यवहार करु शकणार नाहीत. बँकेत खाते उघडता येणार नाही. स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) अथवा म्युच्युअल फंडमध्ये (Mutual fund)गुंतवणूक करत असाल तर 31 मार्च 2023 रोजीनंतर तुमचे संबंधित स्टॉक आणि म्युच्युअल फंड खाते अवैध घोषित होईल. तसेच नागरिकांना बँकेत नवीन खाते उघडायचे असेल तर ही प्रक्रिया आधारकार्ड पॅनकार्ड सोबत जोडणी न केल्यामुळे पूर्ण होणार नाही.पॅनकार्ड आधारकार्ड ची लिंक न केल्यास त्याचा आणखी एक फटका तुम्हाला बसू शकतो. नोकरदार वर्गाने कार्ड संलग्नता करण्यात दिरंगाई केली तर तीन पट टीडीएस (TDS) कपात होईल. पीएफ खात्यातून पैसे काढताना हे दोन्ही कार्ड संलग्न नसतील तर नागरिकांना तीन पट जास्त टीडीएस द्यावा लागेल.

असे जोडा पॅनकार्ड आधारशी

https://incometaxindiaefiling.gov.in/या पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करा यापूर्वीच नोंदणी असेल तर युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग-इन करा आता एक पॉप-अप विंडो दिसेल. त्यात पॅनकार्ड आधारशी जोडण्याचा निर्देश असेल. मेन्यू बारवर प्रोफाईल सेटिंग्जवर जाऊन ‘लिंक बेस’वर क्लिक करा पॅन कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि जेंडर यासारख्या तपशीलाची माहिती जवळ ठेवा स्क्रीनवर लिहिलेले पॅन तपशील व्हेरिफाय करा. तपशील जुळल्यास आपला आधार क्रमांक नोंदवा आणि “लिंक नाऊ” बटणावर क्लिक करा. एक पॉप-अप संदेश आला असेल. आधार कार्ड पॅनकार्डशी यशस्वीरित्या जोडल्याची माहिती संदेशाद्वारे मिळेल.

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.