राज्यात तब्बल 35 हजार कोटींची गुंतवणूक, 23 हजार रोजगारांची निर्मिती; आता 1 लाख कोटी गुंतवणुकीचं टार्गेट!

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:24 PM, 2 Nov 2020
राज्यात तब्बल 35 हजार कोटींची गुंतवणूक, 23 हजार रोजगारांची निर्मिती; आता 1 लाख कोटी गुंतवणुकीचं टार्गेट!

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. या करारानुसार १५ कंपन्यांमार्फत राज्यात जवळपास ३४,८५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून राज्य सरकारने आता आगामी काळात राज्यात 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं उद्दिष्टं ठेवलं आहे. (Thackeray Government MOU 15 Big Companies)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित राज्यातील गुंतवणुकीच्या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केलं. कोणतीही गुंतवणूक करताना विश्वास महत्त्वाचा आहे. गुंतवणूकदार आणि राज्य शासन या दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मला उद्योग खात्याचा अभिमान आहे, असं सांगतानाच आजची गुंतवणूक ही फक्त सुरुवात आहे. अजून 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात आज सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक होत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीतून नुसता बाहेर पडणार नाही तर अधिक सामर्थ्याने आर्थिक बाबींवर आघाडी घेईल, असं ते म्हणाले. कोविडनंतर आपल्याला जगाचे दरवाजे उघडत आहेत. युनिटी इन डाव्हर्सिटी या करारामुळे विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असं सांगतानाच महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीत देशातील महत्त्वाचं केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  (Thackeray Government MOU 15 Big Companies)

 

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचा 15 मोठ्या कंपन्यांसोबत करार; 35 हजार कोटींची गुंतवणूक, 24 हजार रोजगारांचा दावा

शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

(Thackeray Government MOU 15 Big Companies)