Air Conditioner : उन्हाच्या असह्य झळा, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सर्वाधिक AC खरेदी; तिपटीनं विक्री

वर्ष 2021 च्या तुलनेत चालू वर्षी रेफ्रिजरेटरच्या विक्रीत तब्बल तीन पटीहून अधिक विक्री झाली आहे. कूलरचा विक्रीचा आकडा 2.5 पटांवर पोहोचला आहे. पंख्याची देखील दुप्पट संख्येनं विक्री झाली.

Air Conditioner : उन्हाच्या असह्य झळा, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सर्वाधिक AC खरेदी; तिपटीनं विक्री
एअर कंडिशनर
Image Credit source: TV9
सागर जोशी

|

May 22, 2022 | 8:47 PM

नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागात तापमानाचा (Temperature) पारा उंचावला होता. उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. यंदाच्या उन्हाळ्यात तप्त झळ्यांत आल्हादायक वातावरण निर्माण करणाऱ्या उपकरणांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर (Air-conditioner) , कूलर आणि पंखाच्या मागणीत विक्रमी मागणी नोंदविली गेली. चालू उन्हाळ्यात शीत उपकरणांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ग्राहकांच्या खरेदी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या क्रोमा संस्थेनं केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष समोर आले आहेत. वर्ष 2021 च्या तुलनेत चालू वर्षी रेफ्रिजरेटरच्या (Refrigerator) विक्रीत तब्बल तीन पटीहून अधिक विक्री झाली आहे. कूलरचा विक्रीचा आकडा 2.5 पटांवर पोहोचला आहे. पंख्याची देखील दुप्पट संख्येनं विक्री झाली. शीत उपकरणांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांतील पाच पैकी एक ग्राहक बंगळुरु शहरातील असल्याचा निष्कर्षही समोर आला आहे.

नेमकं काय म्हटलयं अहवात जाणून घेऊया ‘पॉईंट-टू-पॉईंट’

  1. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात सर्वाधिक एसीची विक्री. एक टनांहून अधिक क्षमतेच्या एसींना मागणी. उत्तर आणि मध्य भारतात 1.5 टनांचे एसी खरेदीकडं वाढता कलं. एकूण एसी विक्रीच्या संख्येत दीड टनांची एसीची संख्या 60 टक्के.
  2. हैदराबाद, दिल्ली, बंगळुरु शहरात विक्री झालेल्या सर्वाधिक एसीच्या संख्येत कमी वीज वापराच्या 5-स्टार एसीचा समावेश होता. मुंबई, अहमदाबाद, सूरत, चैन्नई, बडौदा आणि इंदौरमध्ये 0 टक्क्यांहून अधिक खरेदी केलेले एसी 3-स्टार होते.
  3. पोर्टेबल एसीत 50 टक्के एसी मुंबई, बंगळुरु, हैदराबाद आणि पुण्यात खरेदी करण्यात आले. 62% हॉट अँड कोल्ड प्रकारातील एसी खरेदी राजधानी दिल्लीत झाली.

‘हवा’ महागणार?

कच्च्या मालाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शीत उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजच्या किंमती वाढविण्याच्या मानसिकतेत उत्पादक कंपन्या आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला किंमती मध्ये वाढ नोंदविली जाऊ शकते. सर्व उपकरणांच्या किंमत वाढीवर कच्च्या मालाचा थेट परिणाम होणार आहे. ग्राहकांच्या खिशाला निश्चितच कात्री लागण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें