AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : बिझनेसच्या पिचवर मास्टर ब्लास्टरची जोरदार बॅटिंग! या कंपनीत केली मोठी गुंतवणूक

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव आता नवीन पिचवर बॅटिंग करणार आहे. या कंपनीत त्याने मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या कंपनीत सचिनने गुंतवणूक केली माहिती आहे का?

Sachin Tendulkar : बिझनेसच्या पिचवर मास्टर ब्लास्टरची जोरदार बॅटिंग! या कंपनीत केली मोठी गुंतवणूक
| Updated on: May 16, 2023 | 11:41 AM
Share

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव आता व्यावसायिक पिचवर जोरदार बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेट पिचवर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मैदान गाजवले आहे. प्रदीर्घ काळ त्याने देशाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या खेळाने अनेकदा एकहाती सामना आपण खेचून आणला आहे. पाकिस्तानविरोधातील त्याच्या खेळीने अजूनही क्रिकेट प्रेमीच नाही तर सर्वसामान्य नागरिक पण रोमांचित होतात. ‘सचिन, सचिन, सचिन’ या एकाच जयघोषाने भारतातीलच नाही तर परदेशातील क्रीडांगणे, स्टेडिअम न्हाऊन निघाली आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून सचिन क्रिकेटच्या मैदानापासून लांब असला तरी तो थांबलेला नाही. त्याने आता मैदान आणि पिच तेवढी बदलली आहे. या कंपनीत त्याने मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या कंपनीत सचिनने गुंतवणूक (Investment) केली माहिती आहे का?

या कंपनीत केली गुंतवणूक सचिन तेंडुलकरने आता क्रिकेटनंतर व्यावसायिक क्षेत्रात पाऊल टाकले आहे. काही स्टार्टअप्समध्ये त्याने गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. तर आता सचिनने चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर भर दिला आहे. स्वच्छ ऊर्जा, विमान, संरक्षण आणि गॅस क्षेत्रात भरीव योगदान असलेल्या कंपनीकडे सचिनने मोर्चा वळविला आहे. या क्षेत्रांसाठी विविध उपकरणे तयार करणाऱ्या आझाद इंजिनिअरिंग या कंपनीत त्याने धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. कंपनीत तो हिस्सेदार झाला आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेला मदत सचिन तेंडुलकरने केलेल्या गुंतवणुकीविषयी सोमवारी आझाद इंजिनिअरिंग कंपनीने माहिती दिली. त्यानुसार, कंपनीत गुंतवणूक करुन मास्टर ब्लास्टरने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानात भरीव योगदान वाढवले आहेत. पण सचिनने कंपनीत किती गुंतवणूक केली. किती हिस्सेदारी खरेदी केली, याची माहिती कंपनीने दिली नाही. मोठी गुंतवणूक केली असली तरी कंपनीत मास्टर ब्लास्टरला अल्पशी हिस्सेदारी मिळाली आहे.

कंपनीला फायदा कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश चोपदार या गुंतवणुकीमुळे रोमांचित झाले आहे. कंपनीसाठी मोठी बातमी आहे. सचिन तेंडुलकर यांनी कंपनीत गुंतवणूक केल्याने सर्वच जण आनंदीत आहेत. कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. कंपनीचा हा सन्मान आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत कंपनीसाठी मास्टर ब्लास्टरने केलेली गुंतवणूक बुस्टर डोस ठरणार आहे. कंपनी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल, असे कंपनीने स्पष्ट केले. यामुळे कंपनीला सेवा क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असा दावा कंपनीने केला आहे. तर या गुंतवणुकीतून सचिनला पण मोठा फायदा होईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.