मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा धमाका; 45 हजार कोटींचा परतावा चारच दिवसांत

शेअर बाजाराने अखेरच्या सत्रात तडाखेबंद खेळी खेळल्याने रिलायन्सला मोठा फायदा झाला. रिलायन्सचा शेअर उसळला. या घौडदौडीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅप 20.13 लाख कोटी रुपयांवर पोहचले. मुकेश अंबानी यांच्या कंपनीशिवाय LIC आणि ICICI Bank ने पण गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा धमाका; 45 हजार कोटींचा परतावा चारच दिवसांत
रिलायन्समुळे छप्परफाड कमाई
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 5:42 PM

शेअर बाजारात चढउताराच सत्र कायम असते. पण बाजारातील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांचे नशीब पालटून टाकले. आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने लांब टप्पा गाठला. या घौडदौडीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅप 20.13 लाख कोटींच्या घरात पोहचले. गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करता आली. या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना अवघ्या 4 दिवसांत 45,000 हजार कोटी रुपयांहून अधिकची कमाई करता आली.

रिलायन्सने केली कमाल

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. मुंबई स्टॉक् एक्सचेंज, बीएसईमधील सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे बाजारातील भांडवल वाढले. तीन कंपन्यांचे बाजारातील मूल्य घसरले. फायद्यातील सात कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 67,259.99 कोटी रुपये होते. यामध्ये रिलायन्सने गुंतवणूकदारांना सर्वाधिक कमाई करुन दिली. बीएसई सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात 819.14 अंकांची भरारी घेतली होती.

हे सुद्धा वाचा

RIL चे बाजारातील भांडवलात वाढ

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने मोठी मजल मारली. या कंपनीचे बाजारातील भांडवल वाढून ते 20.13 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर पोहचले. म्हणजे केवळ चारच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मालामाल झाले. त्यांचा 45,262.59 कोटी रुपयांचा फायदा झाला. रिलायन्स शेअर अखेरच्या सत्रात 2970.30 रुपयांवर बंद झाला होता.

LIC सह ICICI Bank मुळे छपाई

एसबीआय, एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला. एसबीआयचे बाजारातील भांडवल 5,533.26 कोटी रुपयांहून 6,71,666.29 कोटी रुपये झाले. तर एलआयसीचे बाजारातील भांडवल 5,218.12 कोटी रुपयांनी वाढले. आता मार्केट कॅप 5,78,484.29 कोटी रुपये इतके झाले आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 4,132.67 कोटी रुपयांनी वाढून 7,69,542.65 कोटी रुपयांवर पोहचले.

या खेळाडूंचा तिप्पट परतावा

कल्याण ज्वेलर्स इंडियाने 290 टक्के, कोचिन शिपयार्डने 280 टक्के, रेल्वे विकास निगमने 280 टक्के, SJVN स्टॉक्सने 270 टक्के, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने 255 टक्के, झोमॅटोने 255 टक्के, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने 250 टक्के रिटर्न दिला आहे. याशिवाल सोभा, NBCC, स्वान एनर्जी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, अपार इंडस्ट्रीज आणि एनएलसी इंडियाचे शेअर 200-240 टक्के चढले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.