AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम अदानींमुळे सरकार मालामाल; केदारनाथ रोपवे प्रोजेक्टसाठी इतका पैसा ओतणार

Gautam Adani : केदारनाथ येथे जाण्याची अनेकांची इच्छा असते. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारत आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी येथील रोप वे प्रकल्पात रस घेतला आहे. त्यांनी याप्रकल्पासाठी निधी देण्याची तयारी केली आहे.

गौतम अदानींमुळे सरकार मालामाल; केदारनाथ रोपवे प्रोजेक्टसाठी इतका पैसा ओतणार
गौतम अदानींमुळे सरकारचा फायदाImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 19, 2025 | 12:16 PM
Share

केदारनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी एक आनंदवार्ता आहे. त्यांना आता 8-9 तासांची कठीण पदयात्रा करावी लागणार नाही. ते आता केवळ 36 मिनिटात केदारनाथ येथे पोहचतील. रोपवे प्रकल्पाद्वारे ते बाबा केदारनाथचे दर्शन घेऊ शकतील. हा रोपवे जवळपास 13 किलोमीटर लांब आहे. याप्रकल्पासाठी केंद्र सरकारने 4,081 कोटी रुपयांच्या PPP पद्धतीला मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प येत्या सहा वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे. तर या प्रकल्पाचे काम, देखरेख पुढील 35 वर्षांपर्यंत खासगी कंपनीला देण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून गौतम अदानी हे सुद्धा सरकारची कमाई वाढवतील.

किती देणार पैसे

या रोपवे प्रकल्पासाठी अदानी इंटरप्रायजेसने 42% महसूल वाट्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकूण चार पैकी तीन निविदाधारकांनी NHLML (नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड) साथ महसूलात भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. रोपवे प्रोजेक्ट Tri-cable Detachable Gondola (3S) तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्यामध्ये एकावेळी 36 यात्रेकरू जाऊ शकतील. रोज 18,000 आणि वर्षभरात 32 लाख भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

काय आहे रोपवे प्रोजेक्ट?

केदारनाथ रोपवे हा पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. हा जगातील सर्वात मोठा रोपवे असेल. हा रोपवे सोनप्रयाग ते केदारनाथ धामपर्यंत असेल. हा रोपवे तयार केल्यानंतर केदारनाथ येथे येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना मोठी सुविधा मिळेल. पहिल्या टप्प्यात गौरीकुंड ते केदारनाथ धामपर्यंत 9.7 किमी लांब रोपवे तयार करण्यात येईल.

ही योजना केवळ केदारनाथपर्यंत मर्यादीत नाही. गोविंदघाट-घांघरिया-हेमकुंड साहिबपर्यंत 12.4 किमी लांब दुसरा रोपवे प्रकल्पासाठी पण बोली लावण्यात येईल. या प्रकल्पासाठी जवळपास 2,730 कोटींचा खर्च येईल आणि प्रत्येक दिवशी 11,000 यात्रेकरू त्याचा वापर करतील. या रोपवेमुळे केवळ भक्तांचा त्रास वाचणार नाही तर सरकारला चांगली आमदनी मिळेल. सरकारच्या महसूलात वाढ होईल. उत्तराखंड आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. रोपवे प्रोजेक्ट Tri-cable Detachable Gondola (3S) तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्यामध्ये एकावेळी 36 यात्रेकरू जाऊ शकतील. रोज 18,000 आणि वर्षभरात 32 लाख भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.