अदानींनंतर आता अंबानींचा धमाका; ‘ही’ कंपनी रिलायन्सच्या ताब्यात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 03, 2021 | 9:02 AM

Reliance JustDial | जस्ट डायल ही कंपनी 1996 साली सुरु झाली होती. तेव्हा ही कंपनी केवळ फोन बेस्ड होती. त्याकाळात जस्ट डायलची बाजारपेठ प्रचंड मोठी होती. मात्र, अलीकडच्या काळात आलेल्या अर्बन क्लॅप, प्रॅक्टो, अरबन कंपनी, झोमॅटो आणि मेक माय ट्रिप यासारख्या कंपन्यांमुळे जस्ट डायल कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

अदानींनंतर आता अंबानींचा धमाका; 'ही' कंपनी रिलायन्सच्या ताब्यात
मुकेश अंबानी
Follow us

मुंबई: देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूह असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जस्ट डायल ही कंपनी विकत घेण्यात आली आहे. हा व्यवहार पूर्ण झाला असून आता जस्ट डायलवर पूर्णपणे रिलायन्सची मालकी आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून (RRVL) जुलै महिन्यात 3,497 कोटी रुपये मोजून जस्ट डायल कंपनी खरेदी करण्यात आली होती. सगळ्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आता जस्ट डायलचा संपूर्ण ताबा RRVL कडे आला आहे.

सध्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडे जस्ट डायल कंपनीचे 40.90 टक्के समभाग आहेत. आता रिलायन्स अन्य शेअरधारकांकडून 26 टक्के हिस्सा खरेदी करेल.

जस्ट डायल ही देशातील तब्बल 25 वर्षे जुनी इन्फोर्मेशन सर्च अँण्ड लिस्टिंग कंपनी आहे. संपूर्ण देशात या कंपनीचे नेटवर्क आहे. ही कंपनी रिलायन्सच्या ताब्यात आल्यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणावर मर्चंट डेटाबेस उपलब्ध होईल. प्रत्येक तिमाहीत मोबाईल, APP, संकेतस्थळ आणि 8888888888 या टेलिफोन हॉटलाईनच्या माध्यमातून जस्ट डायलला तब्बल 15 कोटी युनिक व्हिजिटर्स भेट देतात.

1996 साली सुरु झाली होती कंपनी

जस्ट डायल ही कंपनी 1996 साली सुरु झाली होती. तेव्हा ही कंपनी केवळ फोन बेस्ड होती. त्याकाळात जस्ट डायलची बाजारपेठ प्रचंड मोठी होती. मात्र, अलीकडच्या काळात आलेल्या अर्बन क्लॅप, प्रॅक्टो, अरबन कंपनी, झोमॅटो आणि मेक माय ट्रिप यासारख्या कंपन्यांमुळे जस्ट डायल कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

रिलायन्सकडून आणखी दोन कंपन्या ताब्यात

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून विटालिक हेल्थ आणि नेटमेडस् या दोन कंपन्याही विकत घेण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने अर्बन लॅडर या कंपनीत 96 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल. या 24 तपासणी नाक्यांची उभारणी करून व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’कडे होता.

मात्र, अदानी समूहाने या कंपनीतील 49 टक्के वाटा विकत घेतला आहे. यासाठी 1680 कोटी रुपये मोजण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किं वा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, अशी माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा,

‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?

मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, देशातील 4 विमानतळांवर नियंत्रण

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI