Multibagger Stock : 25 रुपयांच्या स्टॉकमध्ये तुफान; एकाच वर्षात करोडपती झाले गुंतवणूकदार, तुमच्या हातून निसटला का हा शेअर
Multibagger Stock : टॅरिफ वॉरमध्ये बाजारात मोठी उलथापालथ सुरू असताना या छोट्या पॅकेटने बडा धमाका केला आहे. या शेअरच्या तुफान घौडदौडीमुळे अवघ्या 60 हजारांची गुंतवणूकदार करणारा सुद्धा आज करोडपती झाला आहे. कोणता आहे हा शेअर?

या एका वर्षात सेन्सेक्स 2.50 टक्क्यांनी घसरला. निफ्टी 50 मध्ये 2.59 टक्क्यांची घसरण आली. ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ वॉर आणि भूराजकीय घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अशा बिकट स्थितीतही हा शेअर बलभीम ठरला. आरआरपी सेमीकंडक्टर(RRR Semiconductor) स्टॉकने अनेकांना अचंबित केले आहे. या शेअरने अवघ्या 60 हजारांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आज करोडपती केले आहे. या शेअरची किंमत 25 रुपयांहून थेट 4555 रुपयांवर पोहचली आहे. या शेअरमध्ये 17000 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
महाराष्ट्रातील कंपनी
आरआरपी सेमीकंडक्टर लिमिटडे ही महाराष्ट्रात आऊटसोर्सड सेमीकंडक्टर असेम्बल करते आणि त्याची चाचणी करते. या कंपनीची सुरुवात 1980 साली झाली होती. भारतात सेमीकंडक्टर मिशनतंर्गत ही कंपनी ॲप्पलसाठी पार्ट्स तयार करते. अमेरिकेतील इतर अनेक कंपन्यांसाठी सुद्धी ही कंपनी काम करते. कंपनी आता इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस आणि सेमीकंडक्टर व्यवसायात उतरली आहे.
1 वर्षांत 17,700 टक्क्यांचा परतावा
आरआरपी सेमीकंडक्टरने 1 वर्षात गुंतवणूकदारांना 17,700 टक्क्यांचा परतावा दिला. 9 सप्टेंबर 2024 रोजी हा शेअर 22.59 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 4,555.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. 9 सप्टेंबर रोजी एखाद्याने या कंपनीत 60 हजारांची जर गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचे 1 कोटी रुपये मूल्य झाले असते. तर एक लाख रुपयांचे मूल्य आज 1.77 कोटी रुपये झाले असते.
वर्ष 2025 मध्ये आरआरपी सेमीकंडक्टर शेअरने गुंतवणूकदारांना 2356 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी या शेअरचा भाव 1865.50 रुपये होता. जर आठ महिन्यांपूरवी या मल्टिबॅगर शेअरमध्ये एखाद्याने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 24,55,525 रुपये झाले असते. एका महिन्यात या स्टॉकची स्थिती अजून मजबूत झाली आहे. बाजारातील चढउताराचा मोठा परिणाम या स्टॉकवर दिसून आला नाही.
तेजीचे कारण तरी काय?
या शेअरमध्ये इतके तुफान का आले हा सवाल अनेकांना पडला आहे. त्यामागे सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकार सेमीकंडक्टर इंडस्ट्रीजवर जादा लक्ष्य देत आहे. या क्षेत्रातील कंपन्यांना अधिक सवलती आणि सेवा देण्यात येत आहे. आरआरपी सेमीकंडक्टरचे मार्केट कॅप 6130 कोटी रुपये आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा वाटा अवघा 1.28 टक्के इतका आहे.
डिस्क्लेमर: हा शेअरचा केवळ लेखाजोखा. हा गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.
