Share Market : गुंतवणूकदारांना 6 महिन्यातच लॉटरी! या शेअरमध्ये तुफान,असे झाले मालामाल
Multibagger Stock : या स्टॉकमुळे पैशांना जणू पंख लागले. पैसा सहा महिन्यातच कित्येक पटीने वाढला. गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला. गुंतवणूकदार मालामाले झाले. कोणता आहे हा छोटुराम शेअर?

Spice Lounge Food Works : यंदा काही छोटुरामने बाजारात धुमाकूळ घातला. पडत्या बाजारात जिथं दिग्गज कंपन्यांचा इस्कोट झाला. तिथं या स्मॉल कॅप कंपन्यांनी बाजाराला आश्चार्याचा धक्का दिला. गुंतवणूकदारांचा मोठा फायदा करुन दिला. या स्टॉकमुळे पैशांना जणू पंख लागले. पैसा सहा महिन्यातच कित्येक पटीने वाढला. गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला. गुंतवणूकदार मालामाले झाले. कोणता आहे हा छोटुराम शेअर?
Spice Lounge Food Works कंपनीने गुंतवणूकदारांना ही लॉटरी लावली आहे. कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे. पण अवघ्या 6 महिन्यात गुंतवणूक कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना या कंपनीने छप्परफाड परतावा दिला. यंदा या कंपनीने शेअर स्प्लिट पण केला. त्याचाही फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.
11 रुपयांहून मोठी झेप
हा शेअर 6 महिन्यांपूर्वी 10.98 रुपयांवर ट्रेड करत होता. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 39.94 रुपयांवर पोहचला होता. म्हणजे केवळ 6 महिन्यात Spice Lounge Food Works कंपनीच्या शेअरचा भाव 263 टक्क्यांपर्यंत वधारला. त्यामुळे ज्यांनी शेअरची विक्री केली नाही. त्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला. 2025 मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव 309 टक्क्यांनी वधारला. तर 1 वर्षात या स्टॉकने 710 टक्क्यांचा रिटर्न दिला. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यांची चांदी झाली.
3 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 50.94 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 4.83 रुपये इतका होता. कंपनीचे मार्केट कॅप 2729.23 कोटी रुपये इतके आहे. तर 3 वर्षात या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना 1021 टक्के आणि 5 वर्षात 3246 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर 5 वर्षांत सेन्सेक्स इंडेक्समध्ये 109 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे. ही कंपनी 1981 मध्ये सुरु झाली. कंपनीचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. कंपनी आयटी आणि आर्थिक सेवा क्षेत्रात काम करते. कंपनीने यंदा शेअर स्प्लिट केला आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
