Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये 167 रुपयांची एसआयपी आणि व्हा करोडपती

Mutual Fund SIP : SIP च्या बचतीद्वारे तुम्ही करोडपती होऊ शकता. रोज 167 रुपये गुंतवून 25 वर्षांत कोट्याधीश होता येते. शेअर बाजाराची जोखीम नको असलेल्या गुंतवणूकदारांना हा पर्याय चांगला आहे. सोने-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये 167 रुपयांची एसआयपी आणि व्हा करोडपती
म्युच्युअल फंड
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 12:02 PM

जर कमाईतील काही हिस्सा तुम्ही भविष्यातील सुख-सोयीसाठी आणि खर्चासाठी बचत केला तर तुमचा फायदा होईल. त्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. यामध्ये शेअर बाजारा इतकी जोखीम सुद्धा नाही. म्युच्युअल फंडात परतावा पण चांगला मिळतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय असतात. एसआयपी आणि एकदाच रक्कम गुंतवता येते. रोजच्या 167 रूपयांच्या एसआयपीतून तुम्ही 5 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. आहे काय हा फॉर्म्युला?

कसे व्हाल मालामाल?

SIP नवीन गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. ज्यांना बचत करायचीच नाही तर त्यातून कमाई करायची आहे. त्यांना हा पर्याय चांगला आहे. रोज 167 रुपये आणि महिन्याला 5000 हजार रूपयांच्या बचतीमधून तुम्ही 5 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. त्यासाठी योग्य फंड आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या. 50:30:20 हा नियम तुम्ही कसोशिने पाळला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची बचत वाढेल. ही बचत तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवू शकता. त्यामुळे चांगल्या योजनेत तुम्हाला अल्पबचतीच्या माध्यमातून मोठा निधी उभारता येईल.

हे सुद्धा वाचा

कसा होईल तुम्हाला फायदा?

रोज 167 रुपये आणि महिन्याला 5000 हजार रूपयांच्या बचतीमधून तुम्ही 5 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. ही गुंतवणूक तुम्हाला 25 वर्षांसाठी करावी लागेल. या 25 वर्षांत 1,27,67,581 रुपयांची बचत होईल. जर वार्षिक 15 टक्के परतावा गृहित धरला तर त्यावर 3,94,47,362 रुपयांचा परतावा मिळेल. गुंतवणूक आणि परतावा यांचे गणित जोडले तर एकूण जवळपास 5.22 कोटी रुपयांची रक्कम जमा होईल. पुढील 25 वर्षांत तुम्ही 5 कोटींचे मालक व्हाल.

कम्पाऊंडिंगचा लाभ

दीर्घकालीन गुंतवणुकीत SIP केल्यास त्याचा मोठा फायदा होतो. एसआयपीत तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कराल त्याचा चांगला लाभ मिळतो. एसआयपीवर बाजारातील घडामोडींचा प्रभाव पडतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी, चांगला म्युच्युअल फंडाची निवड करणे आवश्यक असते. त्यासाठी बाजारातील तज्ज्ञाची मदत जरुर घ्या.

सूचना : हा म्युच्युअल फंडचा केवळ लेखाजोखा आहे. या फंडची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.