आता IMPS च्या माध्यमातून NPS खात्यात पैसे जमा करता येणार, होणार मोठा फायदा

नॅशनल पेंशन सिस्टिम (National Pension System) या पेंशन स्कीमध्ये गुंतवणूक करमाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ते आपल्या एनपीएस खात्यामध्ये IMPS च्या माध्यमातून मनी ट्रान्सफर करु शकतात.

आता IMPS च्या माध्यमातून NPS खात्यात पैसे जमा करता येणार, होणार मोठा फायदा

मुंबई : नॅशनल पेंशन सिस्टिम (National Pension System) या पेंशन स्कीमध्ये गुंतवणूक करमाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ते आपल्या एनपीएस खात्यामध्ये डायरेक्ट रेमिटन्स (डी रेमिट) अंतर्गत IMPS च्या माध्यमातून मनी ट्रान्सफर करु शकतात. त्यासाठी NPS सब्सक्रायबर्सना ईमीडियेट पेमेंट सिस्टमची (IMPS) सेवा प्रदान करण्यात आली असून ही सुविधा 1 मार्च 2021 पासून सुरु झाली आहे.

खात्यात लगेच पैसे जमा होणार

पेंशन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने 10 मार्च 2021 एक आदेश जारी केला होता. यामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोपरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे दिली जाणारी इन्स्टंट फंड ट्रान्सफर सुविधा म्हणजेच IMPS चा उपयोग एनपीएस सब्सक्रायबर्स करु शकतात असं सांगितलं होतं. या सुविधामुळे आयएमपीएसच्या माध्यमातून एनपीएस खात्यामध्ये त्वरित पैसे जमा केले जाऊ शकतात. IMPS मोबाईल, इंटरनेट, एटीएम आणि एसएमएस अशा विविध माध्यमातून रियल-टाईम फंड ट्रांसफर सेवेचा लाभ मिळतो.

एनपीएस काय आहे?

ही एक रिटायरमेंट सेव्हिंग स्कीम आहे. या स्कीमला केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 मध्ये लॉन्च केले होते. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर नोकरीतून निवृत्ती मिळाल्यानंतर पैसे काढता येतात. इन्कम टॅक्स ए‌ॅक्ट 80 सी आणि 80 सीसीडी (1बी) कलामांतर्गत करामध्ये सूट मिळते. ही एनपीएस स्कीम 2009 मध्ये सरकारी तसेच खासगी नोकरदारांसाठी खुली करण्यात आली

मागील वर्षी पेंशन फंड रेग्युलरेटरी अ‌ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) एनपीएस सबस्क्राईबर्ससाठी पेमेंट करण्यासाठी डायरेक्ट रेमिट (D-Remit) ही सुविधा सुरु केली होती. याच्या मध्यमातून एनपीएस सबस्क्राईबरर्स आपल्या खात्यामध्ये एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) च्या माध्यमातून पैसे टाकण्याची सोय केली होती.

इतर बातम्या :

HDFC Bank कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या लसीकरणाचा खर्च उचलणार; 1 लाख कुटुंबांना लाभ

Gold Rate Today : सोनं आणि चांदी 1000 रुपयांनी स्वस्त; झटपट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

Petrol Diesel Rate Today : ग्राहकांना दिलासा, सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही, तुमच्या शहरातील दर काय?

Published On - 7:33 pm, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI