डिसेंबरपासून 24 तास NEFT सुविधा मिळणार : आरबीआय

रिझर्व्ह बँकेकडून नागरिकांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) सेवा 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:55 PM, 7 Aug 2019

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून नागरिकांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) सेवा 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कधीही पैसे ट्रान्सफर करता येतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वीही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वेळेची मर्यादा होती. महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सोडला तर वर्किंग डे दरम्यान सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येत होते. मात्र आता ही मर्यादा हटवून आरबीआयने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 24 तास सेवा उपलब्ध केलीआहे. त्यामुळे आता दिवसाच्या कुठल्याही वेळी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत.

“डिसेंबर 2019 पासून NEFT सेवा 24 तास उपलब्ध होईल. या माध्यमातून रिटेल पेमेंट सिस्टममध्ये क्रांतिकारी बदल होतील. अशी अपेक्षा करतो”, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

NEFT च्या माध्यमातून ग्राहक देशातील कोणत्याही बँकेतून दुसऱ्या बँकेत सहज पैसे पाठवू शकतात. गेल्यावर्षी आरबीआयने देशात आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आणि एनईएफटीच्या माध्यमातून करण्यात येणारे ट्रान्झॅक्शन फ्री केले होते.

प्रीपेड रिचार्ज सोडून सर्व बिल पेमेंटला भारत बिल पेमेंट (BBPS) सिस्टमसोबत जोडणार. BBPS च्या माध्यमातून सध्या डीटीएच, इलेक्ट्रिसिटी, गॅस, टेलिकॉम आणि पाण्याचे बिल भरले जाते.