ईपीएफओची कमाल, 14 लाखाहून अधिक मेंबर जोडले; काय आहे डेटा?

नोव्हेंबर 2024 मध्ये ईपीएफओने 14.63 लाख नवीन सदस्य जोडले, ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.88% वाढ आहे. यात 18-25 वयोगटातील 4.81 लाख (एकूण 54.97%) सदस्य आहेत, ज्यामुळे तरुणांच्या रोजगारात वाढ झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्राने सर्वाधिक सदस्य जोडले. महिला सदस्यांची संख्या देखील वाढली आहे.

ईपीएफओची कमाल, 14 लाखाहून अधिक मेंबर जोडले; काय आहे डेटा?
epfo Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 7:17 PM

निवृत्ती निधी संस्था (ईपीएफओ)ने नोव्हेंबर 2024 मध्ये 14.63 लाख नवे सदस्य जोडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.88 टक्क्यांची ही वाढ आहे. कामगार मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. नेट सदस्य जोडण्यात आल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, असं कामगार मंत्रालयाने म्हटलं आहे. ऑक्टोबर 2024 पेक्षा यावेळी 9.07 टक्क्यांनी निवडळ सदस्य नोंदणीत वाढ झाली आहे. ईपीएफओने नोव्हेंबर 2024 मध्ये सुमारे 8.74 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली आहे. त्यात वर्षभरापूर्वीपेक्षा 18.80 टक्क्यांची वाढ आणि ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत 16.58 टक्के ही वाढ आहे. या डेटातील खास बाब म्हणजे नव्याने जोडण्यात आलेले हे सर्व मेंबर 18-25 वयोगटातील आहेत.

या वयोगटात 4.81 लाख नवीन सदस्य जोडले आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी ही संख्या 54.97 टक्के आहे. नोव्हेंबर 2024 साठी 18 ते 25 वयोगटातील जोडले गेलेले मेंबर अंदाजे 5.86 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 च्या मागील महिन्याच्या तुलनेत 7.96 टक्क्यांनी ही वाढ आहे. त्यामुळे नोकऱ्यांमध्ये सामील झालेल्यांमध्ये युवावर्गाची संख्या अधिक झाली आहे.

ज्यामुळे संघटित कार्यशक्तीमध्ये सामील होणार्या बहुतेक व्यक्ती युवा आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नोकरी शोधणारे आहेत. पेरोल डेटानुसार सुमारे 14.39 लाख सदस्य बाहेर पडले आहेत आणि नंतर ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. हा आकडा मागील ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत 11.47 टक्क्यांची वाढ दर्शवतो. तो नोव्हेंबर 2024 मध्ये 34.75 टक्क्यांची वर्ष-दरवर्षाची महत्त्वपूर्ण वाढ देखील दाखवतो.

नोकरी बदलली आणि…

ज्यांनी नोकरी बदलली आणि ईपीएफओच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या संस्थांमध्ये पुन्हा सामील झाले आणि अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांचे संचयन हस्तांतरित करण्याची निवड केली. त्यामुळे दीर्घकाळासाठी आर्थिक संरक्षण झालं. तसेच आपल्या सामाजिक सुरक्षेचा विस्तारही झाला.

विश्लेषण काय?

पेरोल डेटाचे राज्यवार विश्लेषण दर्शविते की, शीर्ष पाच राज्यां/केंद्र शासित प्रदेशांमध्ये निव्वळ सदस्य जोडण्यात सुमारे 59.42 टक्के योगदान आहे. ज्यामुळे एकूण 8.69 लाख निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत. यामध्ये महाराष्ट्राने महिन्याच्या दरम्यान 20.86 टक्के निव्वळ सदस्य जोडून अग्रगणी स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात, दिल्ली, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी महिन्याच्या दरम्यान एकूण निव्वळ सदस्यांपैकी 5 टक्क्यांहून अधिक सदस्य स्वतंत्रपणे जोडले आहेत.

महिलांची संख्या वाढली

या महिन्याच्या दरम्यान निव्वळ महिला सदस्यांची संख्या 3.13 लाख होती, जी ऑक्टोबर 2024 मध्ये 12.16 टक्क्यांची वाढ दर्शवते. त्याचप्रमाणे, हे प्रमाण 2023 च्या नोव्हेंबर महिन्यापासून 11.75 टक्क्यांची वाढ दर्शवते. मंत्रालयाने सांगितले की, महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढ हे एक समावेशी आणि विविध कार्यबलाच्या दिशेने होत असलेल्या व्यापक बदलांचे संकेत आहे. पेरोल डेटा अनंतिम आहे कारण डेटा निर्मिती आणि कर्मचारी रेकॉर्ड अद्यतनित करणे एक सतत प्रक्रिया आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.