AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीच्या एका डीलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, थरमॅक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 15 टक्क्यांची वाढ

थरमॅक्स लिमिटेडच्या (Thermax Ltd) शेअरमध्ये (Stock) बुधवारी मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. कंपनीचा शेअर 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर बंद झाला. राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल (Petrochemical) कॉम्प्लेक्ससाठी युलिटलिटी बॉयलर आणि इतर सिस्टमसाठी कंपनीला 522 कोटी रुपयांची ऑडर मिळाल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली होती.

कंपनीच्या एका डीलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, थरमॅक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 15 टक्क्यांची वाढ
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 14, 2022 | 11:45 AM
Share

थरमॅक्स लिमिटेडच्या (Thermax Ltd) शेअरमध्ये (Stock)  बुधवारी मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. कंपनीचा शेअर 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर बंद झाला. राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल (Petrochemical) कॉम्प्लेक्ससाठी युलिटलिटी बॉयलर आणि इतर सिस्टमसाठी कंपनीला 522 कोटी रुपयांची ऑडर मिळाल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. कंपनीने या ऑडरची माहिती देताच कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी आल्याचे पहायला मिळाले. कंपनीचे शेअर्स 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर पोहोचले. या डीलचा कंपनीला मोठा फायदा होताना दिसून येत आहे. आणखी काही दिवस या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी राहू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑर्डरमध्ये 260 टीपीएच हाय प्रेशर युटिलिटी बॉयलरच्या दोन युनिट्सचा समावेश आहे.

कंपनीने नेमंक काय म्हटंल

थरमॅक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त वाढ दिसून आली. यामागे कारण देखील तसेच होते. कंपनीने आपल्या एका डीलबद्दल माहिती दिली. या माहितीनंतर अचानक कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली. कंपनीचे शेअर्स चौदा टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर पोहोचले. आपल्या डीलबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी युलिटलिटी बॉयलर आणि इतस सिस्टमसाठी कंपनीला 522 कोटी रुपयांची ऑडर मीळाली आहे. या ऑडरची माहिती मिळताच कंपनीच्या शेअर्सने उसळी घेतली.

शेअर मार्केटमध्ये मात्र पडझड

एकीकडे थरमॅक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये वाढ झाली, मात्र दुसरीकडे बुधवार देखील शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच राहिली. सलग तिसऱ्या तिवशी सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. बुधवारी शेअर मार्केट सुरू झाले तेव्हा, सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून येत होती. मात्र दिवसाखेर पुन्हा एकदा शेअर मार्केट कोसळले. सेंसेक्स 650 हून अधिस अंकाच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीला देखील मोठा फटका बसला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

संबंधित बातम्या

Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटते राज्यात सर्वाधिक दारू विक्री, गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड तोडला; तरीही महसुलात घट

आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली