AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ओयो’च्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 25 टक्के कपात, चार महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्याचीही चाचपणी

'ओयो' ही ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणारी आघाडीची कंपनी आहे. 'ओयो'चे भारतात जवळपास दहा हजार कर्मचारी असल्याची माहिती आहे. (Oyo asks employees to take 25 percent pay cut)

'ओयो'च्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 25 टक्के कपात, चार महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्याचीही चाचपणी
| Updated on: Apr 22, 2020 | 5:48 PM
Share

मुंबई : ‘ओयो’ हॉटेल्स अँड होम्सने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना 25 टक्के वेतनकपात स्वीकारण्यास सांगितले आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीसाठी ही वेतनकपात लागू असेल. काही कर्मचाऱ्यांना मर्यादित लाभांसह सुट्टीवर पाठवण्याचा निर्णयही ‘ओयो’ने घेतला आहे. ‘कोरोना’ संकटामुळे ओढावलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (Oyo asks employees to take 25 percent pay cut)

‘ओयो’ ही ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणारी आघाडीची कंपनी आहे. ‘ओयो’ चे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी ईमेलद्वारे वेतनकपातीचा निर्णय कर्मचार्‍यांना कळवला आहे. ‘ओयो’चे भारतात जवळपास दहा हजार कर्मचारी असल्याची माहिती आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’ वृत्तपत्राने या ईमेलच्या हवाल्याने यासंबंधी वृत्त दिले आहे.

‘आपली कंपनी भारतासाठी एक अवघड परंतु आवश्यक पाऊल उचलत आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्क्यांची कपात करण्याचा घेतलेला निर्णय आपण मान्य करावा. एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीसाठी ही कपात लागू असेल.’ असं या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

‘आपल्या कराराचे इतर सर्व फायदे आणि अटी तसेच राहतील. प्रस्तावित वेतन कपातीनंतर कोणत्याही कर्मचार्‍याचे निश्चित वार्षिक वेतन 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसेल, याची काळजी घेतली जाईल’ अशी हमीसुद्धा देण्यात आली आहे. (Oyo asks employees to take 25 percent pay cut)

हेही वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल महागला, टोल दरात तब्बल 40 ते 122 रुपयांची वाढ

“4 मे 2020 पासून ऑगस्ट 2020 पर्यंत चार महिन्यांसाठी काही कर्मचाऱ्यांना सुट्टीवर (लिव्ह विथ लिमिटेड बेनिफिट्स किंवा एलडब्ल्यूएलबी) पाठवण्याचा कठोर निर्णय आम्ही घेत आहोत. परंतु मुलांची शालेय फी परतफेड, आणि वैद्यकीय विमा, पालकत्व विम्यासारखे फायदे त्यांना मिळतील. सुट्टीवर पाठवलेल्या आमच्या सहकाऱ्याच्या बाबतीत एखादी अनपेक्षित वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर आम्ही विमा रकमेच्या पलिकडे मदत करु” असं आश्वासनही कंपनीने दिलं आहे.

आर्थिक संकट असतानाही कर्मचारी कपात केली जाणार नाही, लवकरात लवकर या संकटातून बाहेर येण्यासाठी कंपनी आवश्यक ती पावलं उचलत आहे. पुन्हा व्यवसाय सुरु होईल, असा विश्वास रोहित कपूर यांनी व्यक्त केला आहे.

(Oyo asks employees to take 25 percent pay cut)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.