
योगगुरू स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या प्रयत्नांमुळे पतंजली आयुर्वेद आता देशातच नव्हे तर वैश्विक स्तरावर नव्या रणनीतीद्वारे आगेकूच करत आहे. पतंजली आयुर्वेद भारतीय पारंपारिक चिकित्सा आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी वैश्विक शक्तीच्या रुपात पुढे येत आहे. पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञानाला जगभरात पुढे नेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्था अत्यंत महत्त्वाची पावले टाकत आहे. विदेशातील पतंजलीच्या लोकप्रियचं कारण म्हणजे एका स्वदेशी ब्रँडला मान्यता मिळण्यासारखं आहे. ही उत्पादने राष्ट्रीय गौरवाच्या भावनेला प्रोत्साहन देत आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेवर योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पतंजली कंपनी केवळ एक व्यवसाय नाहीये. तर संपूर्ण समाज आणि मानव कल्याणासाठीच्या जबाबदारीची कटिबद्धता आहे. आता ही एक चळवळ बनून पुढे येत आहे. पतंजलीचे उत्पादन नैसर्गिक जीवनशैली अंगिकारण्यास प्रोत्साहन देत आहे. विदेशातील ग्राहक पतंजलीच्या उत्पादनाचा वापर अत्यंत अभिमानाने करत आहेत, असं रामदेव बाबांनी सांगितलं.
आजच्या घडीला केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक देशातील कोट्यवधी लोक पतंजलीच्या उत्पादनाचा वापर करत आहेत. ही उत्पादने आधुनिक, जैविक आणि पारंपारिक पर्यायांना पर्याय ठरत आहेत. ज्याचा संबंध आरोग्य, शिक्षण, अध्यात्म आणि मानव कल्याणाशी आहे, अशा उत्पादनांवर पतंजली जोर देत आहे. पतंजली जैविक समाधानाच्या लाभाचीही माहिती देत आहे.
पतंजलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा विस्तार केला आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशात आपला दबदबा निर्माण करण्याची योजना आखली आहे. त्याशिवाय पतंजली ऑनलाइन स्टोरमधून ग्राहकांना पतंजलीचे उत्पादन सहजपणे मिळत आहेत.
पतंजली आयुर्वेद आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून आरोग्य आणि स्वास्थाला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय रुपाने काम करत आहे. त्यात खाद्य पदार्थ, औषधे, बॉडी केअर उत्पादन, हर्बल सामान आणि पुस्तकांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांची सर्व उत्पादने नैसर्गिक, जैविक आणि रासायनिक युक्त बाजारातील अन्य उत्पादनाच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहेत. त्यामुळेच पतंजलीचे उत्पादने चांगली आणि सहज उपलब्ध होत असल्याने ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत.
पतंजलीने नुकतेच डीजिटल मार्किटिंग, सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगातील अनेक देशात आपला विस्तार केला आहे. पतंजलीने एक मजबूत नेटवर्क तयार केला आहे. व्यावसायिक भागिदारीच्या माध्यमातून कंपनीने एक मोठा ग्राहक वर्ग तयार केला आहे. कंपनीचं लक्ष नैसर्गिक आणि पारंपारिक चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदाप्रती लोकांचा नवा विश्वास कायम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पतंजलीच्या उत्पादनांची आवक हळूहळू वाढत आहे.
पतंजलीने नुकताच महाराष्ट्रातील नागपूरमध्ये खाद्य आणि हर्बल पार्क सुरू केला आहे. उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतू आहे. कंपनीने या प्रकल्पात 700 कोटींची गुंतवणूक केली आहे. भविष्यता ही गुंतवणूक 1500 कोटीवर नेण्याचा प्लानही कंपनीने केला आहे. शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करण्यासाठी हा पार्क तयार केला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा हा या मागचा हेतू आहे. या ठिकाणी जैविक शेतीलाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे.