AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री गाढ झोपेत 18 जणांना जलसमाधी, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? महत्त्वाची अपडेट समोर

नेपाळच्या धाडिंग जिल्ह्यात पोखराहून काठमांडूला जाणारी बस ३०० फूट खोल त्रिशुली नदीत कोसळली. १८ मृतांमध्ये न्यूझीलंडच्या पर्यटकांचा समावेश असून, भीषण अंधारात लष्कराने राबवलेल्या थरारक बचावकार्याची सविस्तर माहिती.

मध्यरात्री गाढ झोपेत 18 जणांना जलसमाधी, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? महत्त्वाची अपडेट समोर
nepal bus accident
| Updated on: Feb 24, 2026 | 8:09 AM
Share

नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यात सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक बस अपघात झाला. पर्यटकांचे मुख्य केंद्र असलेल्या पोखराहून राजधानी काठमांडूकडे जाणारी एक प्रवासी बस नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून सुमारे ३०० फूट खाली त्रिशुली नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये न्यूझीलंडच्या दोन पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर आता सध्या बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Ga 1 Kha 1421 या क्रमांकाची बस रविवारी रात्री पोखराहून प्रवाशांना घेऊन निघाली होती. पहाटे १.३० च्या सुमारास अनेक प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिका-५ मधील भैसपती परिसराजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्यावरून घसरत सुमारे ३०० मीटर खोल उतारावरून थेट नदीपात्रात कोसळली. या भीषण आघातामुळे बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.

टॉर्चच्या प्रकाशात आणि बोटींच्या साहाय्याने बचावकार्य

या अपघाताची माहिती मिळताच नेपाळ लष्कर (Nepal Army), सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्रीची वेळ असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले.

पहाटेची वेळ असल्याने आणि परिसर डोंगराळ असल्याने बचाव पथकाला केवळ हातातील टॉर्चच्या प्रकाशावर रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. ही बस ज्या ठिकाणी कोसळली, तिथे पोहोचणे अत्यंत कठीण होते.

यावेळी जखमींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने बोटींचा वापर करण्यात आला. अनेक प्रवाशांना नदीच्या पात्रातून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरक्षित किनाऱ्यापर्यंत बोटीने आणले गेले आणि तिथून रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवण्यात आले.

मृतांची आणि जखमींची आकडेवारी

मुख्य जिल्हा अधिकारी सुवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये १२ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. तसेच यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश असून ते दोघेही न्यूझीलंडचे रहिवाशी आहेत.

तसेच या दुर्घटनेत २७ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये ८ महिला, १८ पुरुष आणि १ अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. सध्या जखमींवर धाडिंग आणि काठमांडू येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताचे नेमके कारण काय?

धाडिंग जिल्हा वाहतूक पोलीस कार्यालयाचे प्रमुख शिशिर थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात प्राथमिकदृष्ट्या चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने घडल्याचे दिसते. मात्र, महामार्गाची दुरवस्था किंवा तांत्रिक बिघाड या पैलूंचीही तपासणी केली जात आहे. नेपाळमध्ये अरुंद रस्ते आणि डोंगराळ भागातील तीव्र वळणे यामुळे वारंवार असे अपघात होत असतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...