AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात पहिल्या डेंग्यू व्हॅक्सीनला मंजूरी, QDENGA लसीची WHO ने देखील केली शिफारस

जगभरात या लसीच्या ३.२ कोटीहून जास्त डोस वाटले गेले आहेत. म्हणजे गुणवत्ता, सुरक्षा आणि परिणामकतेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय मानकांवर ही लस उत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतात पहिल्या डेंग्यू व्हॅक्सीनला मंजूरी, QDENGA लसीची WHO ने देखील केली शिफारस
QDENGA VACCINE
| Updated on: Jul 20, 2026 | 3:48 PM
Share

डासांपासून होणाऱ्या जीवघेण्या आजारात डेंग्यू सर्वाधिक धोकादायक म्हटला जात असतो. दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया सारखे आजार डोकेवर काढत असतात. आता डेंग्यूच्या आजारावर बचावासाठी एका लसीला मंजूरी मिळाली असल्याने डेंग्यूच्या धोक्यापासून प्रतिबंधात्मक उपाय सापडला आहे. या प्रतिबंधात्मक व्हॅक्सीनचे नाव QDENGA (क्यूडेंगा) आहे. या लसीला जपानची फार्मा कंपनी Takeda ने तयार केले आहे. भारतात ड्रग कंट्रोलर जनरलनी(DCGI) या लसीला ४ ते ६० वर्षांच्या लोकांसाठी मंजूरी दिली आहे.

QDENGA व्हॅक्सीन म्हणजे काय ?

QDENGA ही भारतात मंजूरी मिळणारी पहिली डेंग्यू व्हॅक्सीन आहे. या लसीची खासियत म्हणजे या लसीला लावण्याच्या आधी त्या व्यक्तीला आधी डेंग्यू झाला आहे की नाही याची टेस्ट करण्याची काही गरज नाही. म्हणजे ही व्हॅक्सीन कोणालाही घेता येते. जर कोणाला आधी डेंग्यू झाला असेल तर त्यालाही ही लस घेता येते. जर डेंग्यू झाला नसेल तरीही लस घेता येते.

कोणाला घेता येणार ?

या व्हॅक्सीनला ४ ते ६० वयोगटातील कोणत्याही लोकांना घेता येणार आहे. याचे एकून दोन डोस घ्यावे लागणार आहेत. दोन्ही डोस दरम्यान तीन महिन्यांचे अंतर राखावे लागणार आहे. ही व्हॅक्सीन त्वचेच्या खाली सिरींज द्वारे घेता येणार आहे.

एक तृतीयांश केस भारतात

डेंग्यूची सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या देशात भारताचा समावेश होतो. जगातील एक डेंग्यूच्या प्रकरणात एक तृतीयांश केस भारतात असतात. गेल्या २० वर्षात भारतात डेंग्यूचे रिपोर्ट केलेल्या प्रकरणात सुमारे ११ टक्के वाढ झाली आहे. साल २०२५ मध्ये देशात १.१३ लाखाहून जास्त प्रकरणे दाखल झाली आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार प्रत्यक्षात याहून जास्त प्रकरण भारतात असतात.

डेंग्यूचे चार प्रकार असून या चार प्रकारासाठी ही डेंग्यूची लस घेतल्यास बचाव करता येतो असे कंपनीने म्हटले आहे. QDENGA ला अशा प्रकारे तयार केले आहे की डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून यात बचाव होऊ शकतो.

QDENGA वर आता पर्यंत मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कंपनीच्या मते आतापर्यंत २८ हजाराहून अधिक लोकांवर याची चाचणी करण्यात आली आहे. क्लीनिकल ट्रायलमध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर १२ महिन्यानंतरही डेंग्यू पासून बचावात ८०.२ टक्के परिणाम आढळला आहे. डेंग्यूमुळे रुग्णालयात भरती होण्याची जोखीम ९०.४ टक्के कमी करण्यात या लसीला यश आले आहे. साडे चार वर्षांनंतरही डेंग्यूमुळे रुग्णालयात भरती होण्यापासून बचावात ८४.१ टक्के परिणाम राहिला आहे. तर सात वर्षांपर्यंत याच्या सुरक्षा आणि प्रभाव कायम राहिला असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

या देशात सार्वजनिक लसीकरणात समावेश

जागतिक आरोग्य संघटनेने देखील या लसीची शिफारस केली आहे. ज्या देशात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे. तेथे ही लस पब्लिक व्हॅक्सीनेशन प्रोग्रॅममध्ये सामील करण्यास काही हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. या व्हॅक्सीनला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रीक्वालीफिकेशन देखील मिळाले आहे. ब्राझील, अर्जेंटीना, कोलंबिया आणि इंडोनेशिया प्रीक्वालीफिकेशन प्रोग्रॅममध्ये देखील हीचा समावेश केला गेला आहे.

Follow Us
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक पूर्ण
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?.

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?

विश्वगुरू झुरळांना घाबरतात… कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरूव ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा.

विश्वगुरू झुरळांना घाबरतात… कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरूव ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे.

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला.

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला