AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6: चांगली माणसे नेहमी खटकतात…, ‘बिग बॉस’च्या घरातून खान्देश किंग बाहेर…, चाहत्यांची नाराजी

Bigg Boss Marathi 6: कोणाचाही द्वेष न करता खेळलो आणि... 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच सचिन कुमावतची पोस्ट... अशा प्रकारे चाहत्यांना व्यक्त केली नाराजी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मराठी बिग बॉसची चर्चा...

Bigg Boss Marathi 6:  चांगली माणसे नेहमी खटकतात..., 'बिग बॉस'च्या घरातून खान्देश किंग बाहेर..., चाहत्यांची नाराजी
सचिन कुमावत
| Updated on: Feb 24, 2026 | 8:25 AM
Share

Bigg Boss Marathi 6: अभिनेता रितेश देशमुख याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी 6’ आता रंगात आला आहे. घरात प्रत्येक स्पर्धक स्वतःचे गेम स्ट्रँग करण्याच्या प्रयत्नात आहे. पण या शर्यतीत खान्देश किंग सचिक कुमावत घराबाहेर पडला आहे. शोच्या सहाव्या आठड्यात सचिन याचा प्रवास संपला आहे. घराबाहेर येताच सचिन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये सचिन याने सर्वांचे आभार मानले आणि मनातील भावना व्यक्त केल्या. तर खान्देशचा किंग बाहेर आल्यामुळे अनेकांनी निराशा देखील व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सचिन कुमावत यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सचिन याने एक पोस्ट शेअर केली आहे. मनातील भावना व्यक्त करत सचिन म्हणाला, ‘बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं… खान्देशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खास होता. एक कलाकार म्हणून 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकलो तेही कोणाचाही द्वेष न करता… प्रामाणिकपणे खेळत… या संपूर्ण प्रवासात दिलेल्या तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यावाद… #khandeshking’ , अशी पोस्ट सचिन कुमावत याने लिहिलं आहे. तर त्यांच्या पोस्ट कमेंट करत अनेकांना सचिन बाहेर आला म्हणून नाराजी देखील व्यक्त केली आहे.

अशी एका पोस्ट करत सचिन कॅप्शनमध्ये म्हणाला, महाराष्ट्राने दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या. लवकरच पुन्हा भेटू…, सचिन याच्या या पोस्ट चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सचिनच्या पोस्टवर कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘चांगली माणसे नेहमी खटकतात…आणि उशिरा कळतात…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सचिन तुम्ही होते म्हणून बिग बॉस पाहील, तुम्ही नाही तर बिग बॉस पण बघणं बंद’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘चांगल्या माणसाची कदर नाही केली आजपासून बिग बॉस बघणे बंद…’, अशा अनेक कमेंट सचिन याच्या पोस्टवर येत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्यानंतर सचिन कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.