Maharashtra Assembly Session 2026 LIVE: बारामती तालुक्यातील सर्व यात्रा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांचं लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. अधिवेशनात आज काय काय होणार, त्याचे अपडेट्स जाणून घ्या..

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज (मंगळवार) दुसरा दिवस आहे. सोमवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान आणि शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या रुपाने मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. कारण विरोधक आज त्यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत. झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
नवी मुंबई : 1 कोटी 2 लाख रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त
नवी मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. तळोजा परिसरात तब्बल 1 कोटी 2 लाख रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी कॅम्प परिसरात छापा टाकत दोन जणांना अटक केली आहे. सुरिंदर सिंग ऊर्फ कालू आणि मनींदर सिंग अशी अटक आरोपींची नावे असून दोघेही मूळचे पंजाबमधील आहेत.
-
नाशिक : सिन्नरमध्ये आंदोलनादरम्यान बस पडली बंद
सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणावरून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रास्तारोको आंदोलन पार पडले. या आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर तणावाचे वातावरण असताना ऐनवेळी भररस्त्यात बस बंद पडली. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असताना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनीच बसला धक्का मारून ती रस्त्याच्या कडेला ढकलत वाहतूक सुरळीत केली.
-
-
पुणे : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला
पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील मामासाहेब मोहोळ कॉलेजच्या गेटवर 12 वीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यावर तीन अज्ञातांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
-
बारामती तालुक्यातील सर्व यात्रा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती तालुक्यातील सर्व यात्रा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांनी केले आहे. सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू होत आहे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या निधनाला एक महिना झाला आहे. यंदा यात्रा साध्या पद्धतीने करून मिरवणुकीचे कार्यक्रम तसेच फटाक्याची आतिशबाजी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात चौथी अटक
बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणी चौथी अटक झाली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव सोनल गरीवाल असे असून स्त्रीबीज तस्करी प्रकरणात महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी केल्याचा आरोप होत आहे.
-
-
पुण्यात कोयता गँगचा उच्छाद सुरुच, १२ वीच्या विद्यार्थ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
पुण्यातील कोथरूड परिसरातील मामासाहेब मोहोळ कॉलेजच्या गेटवर १२ वीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर तीन अज्ञातांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वेग
गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वेग आला आहे. 25 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी झाली आहे. 346 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. 259 कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. 51 हजार शेतकरी अजूनही प्रतिक्षेत आहेत, वाढीव धान खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव आला आहे.
-
राज्यावरचे कर्ज ९.३२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज
राज्यावरचे कर्ज ९.३२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. वाढत्या महसुली तुटीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून या वर्षीच्या पुरवणी मागण्या तुलनेने मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मार्च २०२५ मध्ये, तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांनी ४५,८९० कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अंदाज असलेला अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, जून २०२५ मध्ये ५७,५०९.७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, ज्यामुळे महसुली तूट १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
-
गोंदियात जिल्हा माहिती कार्यालयाकडून जनकल्याण योजनांचे छायाचित्र प्रदर्शन
गोंदिया : जिल्हा माहिती कार्यालयाकडून जनकल्याण योजनांचे छायाचित्र प्रदर्शन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांना योजनांची थेट माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय.
-
बीडच्या न्यायालय परिसरात मारहाण, वकील आक्रमक
बीड जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आज दुपारी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. वकिलाच्या टेबलसमोर गाडी लावल्याच्या कारणावरून काही लोकांकडून थेट वकिलाला मारहाण करण्यात आली. बार काउन्सिलच्या वतीने सर्व वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतलीय पोलीस अधीक्षकांचीदेखील भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात ाली.
-
बहिणीचं शीर धडावेगळं केलं, सख्ख्या भावाकडून निर्घृण हत्या
नालासोपाऱ्यात सख्या भावानेच मोठ्या बहिणीची निर्घूणपणे हत्या केली आहे. गावाच्या जमिनीच्या वादातून ही हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने बहीण, ८० वर्षाची आई यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले आहे. यात आई गंभीर जखमी झाली आहे तर बहिणीची मान शरीरापासून चक्क वेगळी करून निर्घूणपणे हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्व टाकीपाडा सर्वोदय वसाहतीत आज मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे. अजित मालुष्टे असे हत्या करणाऱ्या आरोपी भावाचे नाव आहे तर सुरेख कानडे असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव आहे.याबाबत प्राणघातक हल्ला आणि हत्या या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे
-
भिवंडीत जुन्या वादातून बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
ठाणे : भिवंडीत जुन्या तक्रार वादातून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जखमी झालेल्यांवर आता खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
-
रेबीजच्या भीतीने ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या
कल्याण रेबीजच्या भीतीने ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण आले आहे. आयस विश्वनाथ अमीन याने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये “रेबीजची लक्षणे जाणवत असल्याने आत्महत्या करत असल्याचा केला होता उल्लेख.
-
कल्याण-मुरबाड रोडवर भीषण अपघात
कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. ओव्हरलोड डंपरची बाईकला जोरदार धडक झाली आहे. या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. वैभव साहेबराव भामरे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मालेगावचा रहिवासी आहे.
-
बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा
पालघरमधील बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. पालघरच्या सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी हा छापा टाकला आहे. कारवाईत पाच आरोपींसह लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
-
लाल वादळ अहिल्यानगरकडे रवाना
विविध मागण्यांसाठी अजित नवले यांच्या नेतृत्वात पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे. राजूर बसस्थानकातून भर उन्हात दुपारी 12 वाजता लाँग मार्चला सुरूवात झाली आहे. विठा घाटातून अकोले शहराकडे हा मोर्चा निघाला आहे. शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी महिला कर्मचारी मोर्चात सहभागी झाले आहेत.
-
विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा
विरेधी पक्ष विरोधी पक्ष नेते पदाचं राजकारण करतंय, त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावे, आमच्या कडे ४०-५० वर्ष विरोधी पक्ष नेतेपद नव्हतं. आम्ही बाजू मांडत होतो ना असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लगावला. एंटी करप्शन ब्युरोला पुरेपूर स्वातंत्र दिलंय, अन्य दोषी असते तर त्यालाही पकडलं असतं. विरोधक कशाचंही राजकारण करत आहेत. सोयीचं राजकारण करत आहेत. दुटप्पीपणा आहे, अशी टीका त्यांनी केली.
-
किरीट सोमय्या यांचे बॉडीगार्ड आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची
किरीट सुमयाच्या दौऱ्यात किरीट सोमय्या यांचे बॉडीगार्ड आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची झाली. पत्रकार प्रश्न विचारत असताना अचानक गार्डने पत्रकारांना अरेरावी केली. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना ढकला ढकली केली. सर्व पत्रकारांना धक्काबुकी केली. किरीट सोमैया यांच्या बॉडी गार्डची पुन्हा दादागिरी दिसून आली. पत्रकारांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारले वरून राग आल्याचे समजते.
-
हनुमंत पवार यांना संरक्षण द्या-माजी आमदार मोहन जोशी
गेल्या काही दिवसांत भाजप आणि हिंदुत्वादी संघटना काँग्रेस पक्षावर हल्ले करत आहेत. लोकशाही आणि संविधान आम्ही मानत नाही.., अशी भूमिका घेणार्या पक्षाला पोलिस पाठीशी घालत आहेत. काल झालेली मारहाण काँग्रेस सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाने दखल घेत तातडीने कारवाई अशी मागणी केली आहे. हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्त यांना केली आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.
-
काँग्रेसविरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक
भारतामध्ये जागतिक AI समिट परिषद सुरू असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलना निषेधार्थ ठाण्यात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला. ठाण्यात भाजप महिला मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत भाजप महिला मोर्चा साडी चोळी पाठवणार आहे. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत पोस्टर देखील महिलांनी फाडले आहेत. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अन्यथा अशाच प्रकारचे आंदोलन करत राहू असा इशारा महिला मोर्चाने दिला आहे.
-
बीडच्या माजलगाव तालुक्यातील खानापूरच्या सरपंचासह उपसरपंच अपात्र
बीडच्या माजलगाव तालुक्यातील खानापूरचे सरपंच पंडित आबुज आणि उपसरपंच सोजरबाई क्षीरसागर यांना ग्रामपंचायतच्या एका जागेवरील अतिक्रमण प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अपात्र घोषित केले आहे. सन 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आले होते. विकास कांबळे यांनी 18 जानेवारी 2024 मध्ये सरपंच आणि उपसरपंच यांचे पद रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्णय दिला आहे.
-
शेतकर्यांचे शोले स्टाईल आंदोलन
नाशिक जिल्ह्यातील करंजगाव येथे पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल चढून शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन चर्चेत आले आहे. ग्रामीण रस्ता क्रमांक 127 रस्त्याचे दुसरीकडे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवरील शोले स्टाईल आंदोलन स्थगित केले. ग्रामपंचायतच्या समोर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-
करंजगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन
निफाड (नाशिक) – करंजगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. ग्रामीण रस्ता क्रमांक 127 रस्त्याचे दुसरीकडे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. मात्र पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवरील शोले स्टाईल आंदोलन स्थगित केलं. ग्रामपंचायतीच्या समोर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र तोडगा निघारला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला.
-
किरीट सोमय्या मालेगावात दाखल
किरीट सोमय्या हे मालेगाव अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नंतर सोमय्या आता अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. बनावट जन्म दाखल्यां संदर्भात सोमय्या अप्पर अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार आहेत.
-
यवतमाळ- वणीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
यवतमाळ – चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही तो नाकारल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने थेट विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित शेतकऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
वणी तालुक्यातील बोर्डा येथील शेतकरी सुरेश विधाते आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. चांगल्या दर्जाचा कापूस असताना तो का नाकारला जातो तो कोणाच्या फायद्यासाठी नाकारला ? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
-
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन
भाजपकडून मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाविरोधात सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आलं. सोलापूरचे महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी असताना ओबीसी व्यक्तीला महापौर पद दिल्याने ह आंदोलन करण्यात आलं.
-
मनसेत खलबतं वाढली, ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी ठाणे जिल्ह्याच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात
मनसेत खलबते वाढली आहेत. मुंबई बैठकीनंतर आता ठाणे जिल्ह्याच्या महत्त्वाची बैठक ही राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सुरू आहे.
ठाणे जिल्ह्याच्या बैठकीत मनसे नेते अविनाश जाधव, माजी आमदार राजू पाटील, अभिजीत पानसे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. ठाणे-कल्याणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असून आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा शक्यता आहे.
-
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यामुळे मालेगावमध्ये तणाव
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यामुळे मालेगावमध्ये तणावाचं वातावर आहे. महापौर, उपमहापौर, नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. सोमय्यांच्या विरोधात मालेगावमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्या हे राजकीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
-
माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पक्षाकडून नवी जबाबदारी
नाशिक – माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पक्षाकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. भाजपकडून नवीन प्रदेशात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. पक्षाकडून राज्यातील नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या घोषणा करण्यात आल्या असून उत्तर महाराष्ट्रात माजी खासदार सुजय विखे यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष जबाबदारी देण्यात आली आहे.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधात भाजपा महिला मोर्चाचे निषेध आंदोलन
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस व राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आयोजित AI समिट दरम्यान काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करून देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या..
-
सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी उघडकीस आणला किळसवाणा प्रकार
ठाण्यातील चंदनवाडी परिसरात परप्रांतीय मासे विक्रेत्याला पकडून पळवण्यात आले… सर्व गंभीर प्रकार असल्यामुळे येणाऱ्या काळात अतिक्रमण विभाग यांनी रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या आशांवरती कठोर कारवाई करावी अन्यथा पालिका आयुक्तांच्या दालनात मासे फेकून निषेध व्यक्त केला जाणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी दिला आहे…
-
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवरील माऊली मंदिरा जवळ भीषण अपघात..
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवरील माऊली मंदिरा जवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि इकोकारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. चार जणांचा जागीच मृत्यू तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार असून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम सुरू आहे.
-
विधान भवनाच्या पायऱ्यांवर झिरवाळ्यांचा राजीनाम्याची मागणी
विधान भवनाच्या पायऱ्यांवर झिरवाळ्यांचा राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधक आक्रमक झाले असून, तीन्ही पक्षाचे नेते आंदोलनात उपस्थित आहेत. मंत्रालयात लक्ष्मी दर्शन झिरवाळ राजीनामा द्या अशा घोषणा सुरु आहे.
-
धाराशिवमध्ये द्राक्ष उत्पादकांना अवकाळी पावसाचा फटका, कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी
धाराशिवमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ऐन काढणीच्या काळात झालेल्या पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी द्राक्षांना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. द्राक्षांना तडे गेल्यास बाजारभावात तब्बल ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण होते. अवकाळी पावसामुळे धाराशिवमधील द्राक्ष पट्ट्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत.
-
मी नेतृत्वाचा आभारी, केशव उपाध्ये यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड होताच पहिली प्रतिक्रिया
भाजपने नुकतंच प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात आतापर्यंत मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर आता त्यांनी ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर करत पक्षाचे आभार मानले आहेत.
चंद्रकांत दादा पाटील हे अध्यक्ष असताना त्यांनी एक उदाहरणं दिलेलं आठवत. संघ परिवारात कार्यकर्ता हा पोस्टकार्ड प्रमाणे असतो. जो पत्ता त्यावर टाकाल त्या पत्त्यावर ते पोस्टकार्ड जात. २६ वर्षे पक्षाच काम करीत आहे. जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि गेले ८ वर्ष भाजपाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करत होतो. आता पक्षाने मला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. मी नेतृत्वाचा आभारी आहे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
-
महाविकासआघाडीत कोणतेही भांडण नाही – सतेज पाटील
मविआ म्हणून बैठक झाली नाही. प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं आहे आम्हाला जागा देण्यात यावी. येणाऱ्या आठवड्यात आम्ही एकत्र बसू आणि यावर चर्चा करु. महाविकासआघाडीच्या तिन्हीही पक्षात कोणतेही भांडण नाही, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.
-
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणी 3 महिलांना अटक, 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
बदलापूर मध्ये गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून स्त्री बीज तस्करी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये मुख्य आरोपी असणारी बदलापूरमधील ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर हिला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या साथीदार अश्विनी चाबुकस्वार मंजुषा वानखडे यांनी पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. या तिन्ही आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता तेलंगणा, कर्नाटक, केरळ, नाशिक आणि नागपूरपर्यंत गेले आहेत. तसेच ठाणे आणि उल्हासनगरमधील दोन हॉस्पिटलमध्ये महिलांची सोनोग्राफी केली जात असल्याचेही समोर आले आहे.
-
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार उमेदवार असणार, सूत्रांची माहिती
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार उमेदवार असणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या २६ फेब्रुवारीला वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता ाहे.
-
श्रीकांत शिंदेंवर नवी जबाबदारी, संसदीय मैत्री गटात निवड
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदीय मैत्री गटात निवड करण्यात आली आहे. यामुळे भारताच्या जागतिक कूटनीतीला नवे बळ मिळणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारातून संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचा पुढचा टप्पा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश असलेले बहुपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आला आहे. भारताचा आवाज जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
-
जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवर गेलेल्या भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांची अंताक्षरी
बीच वरील फेरफटका, जंगल सफारी त्यानंतर आता हॉटेलवर एकत्र अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर. धाराशिवमध्ये निवडणूक निकालापासून भाजपसह मित्रपक्षांचे उमेदवार एकत्र सहलीवर. सहलीवरील उमेदवाराकडून मनोरंजनासाठी गाण्याचे बोल
-
नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रात्रीतून उभारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा
बीड तालुक्यातील नेकनूरमध्ये रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. नेकनूर येथील मिरची बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींकडुन गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ् आज अखेर शिवप्रेमींनी रात्रीतून नेकनूरमध्ये हा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं शिवप्रेमींकडुन आनंद व्यक्त केला जातोय तर नेकनूरच्या सौंदर्यात भर पडल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई
आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती, मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
-
अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दणका! स्थगिती आदेश रद्द
कथित फसवणूक प्रकरणात अंबानींना मोठा झटका. अनिल अंबानी विरोधात सुरू केलेल्या फसवणुकीच्या वर्गीकरणाच्या कारवाईला यापूर्वी एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश खंडपीठाकडून रद्द. बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांचे अपिल मंजूर. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांच्या फसवी वर्गीकरणावरून वाद न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या आदेशाला आव्हान. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्यासमोर सुनावणी
-
चंद्रपूर : शिवसेना उबाठाचे नगरसेवक मुंबईत दाखल
चंद्रपूर : शिवसेना उबाठाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेणार आहेत. उबाठाचे 6 नगरसेवक, 2 अपक्ष नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे आणि माजी जिल्हाध्यक्ष सतीश भिवगडे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
-
अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दणका! स्थगिती आदेश रद्द; बँकांच्या अपिलाला हिरवा कंदील
अनिल अंबानी यांच्या विरोधात सुरू केलेल्या फसवणुकीच्या वर्गीकरणाच्या कारवाईला यापूर्वी एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांचे अपिल मंजूर करण्यात आले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांच्या फसवी वर्गीकरणावरून वाद सुरू होता. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा बँकांनी केला होता. स्थगिती उठवल्याने अंबानींसमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
-
आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई
छत्रपती संभाजीनगर- आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती. मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. बंटीया समितीच्या आधी जी स्तिथी होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
-
बीड – माजलगाव तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा
बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तसंच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-
नाशिक – १५ मार्चनंतर शहरात रस्ता खोदकामाला बंदी
नाशिक – १५ मार्चनंतर शहरात रस्ता खोदकामाला बंदी करण्यात आली आहे. शहरातील २८ प्रमुख रस्त्यांवर सध्या एकाचवेळी कामे सुरू आहेत. एकाच वेळी काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दीर्घकालीन नियोजनाचा भाग असल्याने 15 मार्चपर्यंत सर्व केबल पाईप टाकण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. 15 मार्चनंतर खड्डे करण्यास लगाम लावला जाईल.
-
छत्रपती संभाजीनगर- टीईटी नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती नाही; अंतरिम आदेश मागे
छत्रपती संभाजीनगर- शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या याचिकांमध्ये टीईटी अर्हता निर्णायक ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठाने २० फेब्रुवारीचा अंतरिम आदेश मागे घेतला आहे. त्या अंतरिम आदेशानुसार झालेली पदोन्नतीची कार्यवाहीही न्यायालयाने अवैध ठरवली. टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी विचार करता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. नागपूर खंडपीठातील याचिकाकर्ते शिक्षक टीईटी पात्र होते. मात्र त्यांच्या नावांचा पदोन्नती यादीत समावेश झालेला नव्हता. औरंगाबाद खंडपीठातील याचिकांमधील शिक्षकांकडे टीईटी पात्रता नव्हती. त्यामुळे त्यांना पदोन्नतीचा लाभ देता येणार नाही, असा न्यायालयाचा निष्कर्ष आहे.
-
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती निर्माण झाली आहे. द्राक्ष सडल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अगोदरच उत्पादनात घट झाली आहे. त्यानंतर अवकाळी पावसाचं दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे.
-
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर; दादर परिसरातील AQI 150 पार
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली असून दादरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून AQI १५० पार गेला आहे. पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुक्याची चादर पहायला मिळतेय. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत सुरू असलेले मोठमोठे प्रकल्प, खाजगी बांधकाम आणि वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.
Published On - Feb 24,2026 8:20 AM
