AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm च्या अडचणीत आणखी वाढ, आता बसला इतक्या कोटींचा दंड

पेटीएम पेमेंट बँकेला मोठा दंड ठोठावण्यात आलाय. फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट ऑफ इंडिया (FIU-IND) ने पेटीएम पेमेंट बँकेला मनी लॉन्ड्रिंगच्या उल्लंघनासाठी मोठा दंड ठोठावला आहे. त्यामुळे पेटीएमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Paytm च्या अडचणीत आणखी वाढ, आता बसला इतक्या कोटींचा दंड
| Updated on: Mar 01, 2024 | 8:42 PM
Share

Paytm : रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांना सामोरे जात असताना पेटीएमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण आता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा दंड सुनावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेल्या संस्थांनी आपली बेकायदेशीर कमाई पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात ठेवली आणि नंतर ती इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केली.

मनी लाँड्रिंग अंतर्गत पेटीएम कंपनीला 5.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट-इंडिया (FIU-IND), मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेवर दंड ठोठावला आहे.’

निवेदनात म्हटले आहे की FIU-IND ला ऑनलाइन सट्टेबाजी आयोजित करण्यासह अनेक बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या संस्थांच्या नेटवर्कबद्दल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींकडून माहिती मिळाली. पेटीएम पेमेंट्स बँकेचा आढावा त्याच आधारावर सुरू झाला.

यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर ग्राहकांच्या खात्यांमध्ये नवीन ठेवी किंवा क्रेडिट स्वीकारण्यास बंदी घातली होती. नंतर ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेने ही मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक आणि पेटीएमने त्यांची आंतर-कंपनी करार बंद करण्याची माहिती दिली होती. यामुळे 15 मार्चनंतर ग्राहकांना त्यांचे वॉलेट वापरता येईल की नाही हे आव्हान निर्माण झाले. पेटीएमने म्हटले आहे की त्यांच्या ग्राहकांना व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे आणि ते यासाठी अनेक पर्यायांचा विचार करत आहे.

RBI ने म्हटले आहे की UPI हँडलचे स्थलांतर फक्त त्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी असेल ज्यांचे UPI हँडल पेटीएम पेमेंट बँकेशी जोडलेले आहे. आरबीआयचे हे पाऊल पेटीएम पेमेंट बँकेच्या त्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देईल ज्यांचे UPI पेटीएम पेमेंट बँकेशी लिंक आहे.

UPI व्यवहार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होत असल्याने, पेटीएम सध्या टीपीएपी म्हणून वर्गीकृत नाही. दुसरीकडे, Amazon Pay, Google Pay, Mobikwik, PhonePe आणि WhatsApp सह 22 संस्थांकडे सध्या TPAP परवाने आहेत.

कोणतेही UPI खाते सक्रिय ठेवण्यासाठी ते बँक खात्याशी लिंक करणे महत्वाचे आहे. NCPI देशभरातील UPI व्यवहारांवर देखरेख करते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.