AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT शेअर्स बदलू शकतात नशीब; मिळू शकतो 80 टक्क्यांपर्यंत परतावा, जाणून घ्या

देशातील चौथ्या क्रमांकाची IT कंपनी विप्रोने तिमाही आणि आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले असून, मार्च तिमाहीत विप्रोने 3,569.6 कोटी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 18.9 टक्क्यांनी वाढून 13,135.4 कोटी रुपये झाला आहे.

IT शेअर्स बदलू शकतात नशीब; मिळू शकतो 80 टक्क्यांपर्यंत परतावा, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 2:54 PM
Share

गुंतवणूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. कारण, आम्ही तुमच्या फायद्याची माहिती घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला 80 टक्के परतावा मिळू शकतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

शेअर बाजारात पुन्हा कमालीची तेजी दिसू लागली आहे. मंगळवारी सेन्सेक्स 1676.78 अंकांनी वधारला होता. त्याचप्रमाणे बुधवारी सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली आणि बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स 309.40 अंकांच्या तेजीसह बंद झाला. IT कंपन्यांनी मार्च तिमाही आणि आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केल्याने येत्या काही दिवसांत IT क्षेत्राच्या शेअरमध्ये ही तेजी दिसू शकते.

अलीकडेच देशातील चौथ्या क्रमांकाची IT कंपनी विप्रोने तिमाही आणि आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत, ज्यात मार्च तिमाहीत विप्रोने 3,569.6 कोटी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 18.9 टक्क्यांनी वाढून 13,135.4 कोटी रुपये झाला आहे. या सगळ्यादरम्यान आम्ही तुमच्यासाठी IT क्षेत्रातील काही पेनी स्टॉक्सची माहिती घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला आगामी काळात उत्तम परतावा देऊ शकतात.

मॅगेलनिक क्लाउन लिमिटेड

बुधवारी 68.22 रुपयांवर उघडलेल्या IT कंपनीचा शेअर बाजार बंद होताना 6.23 टक्क्यांनी वधारून 71.11 रुपयांवर पोहोचला. मॅगेलनिक क्लाउन लिमिटेडचा 52 आठवड्यांचा उच्चांक 143.20 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 42.60 रुपये आहे. मॅगेलानिक क्लाउन लिमिटेडच्या शेअरने 2 वर्षांत 88 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

क्लाऊड सोफटेक सोल्यूशन्स लि.

बाजार उघडला तेव्हा आयटी कंपनीचा शेअर 16.00 रुपयांवर होता, पण बाजार बंद होईपर्यंत त्याचा शेअर 0.44 टक्क्यांनी घसरून 15.67 रुपयांवर बंद झाला. ब्लू क्लाऊड सोफटेक सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर 52 आठवड्यांतील उच्चांकी 130.50 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 15.29 रुपये आहे. ब्लू क्लाऊड सोफटेक सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअरने 3 वर्षांत 132 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड

बाजार उघडला तेव्हा या कंपनीचा शेअर 95.00 रुपयांवर होता आणि बाजार बंद झाला तेव्हा तो 3.06 टक्के तेजीसह 97.40 रुपयांवर बंद झाला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310.03 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 78.17 रुपये आहे. अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड ही सल्लागार कंपनी संगणक सॉफ्टवेअर आहे. या कंपनीच्या शेअरने 2 वर्षात 339.33 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.