AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: पुन्हा एकदा इंधनाचा भडका, वाचा तुमच्या शहरातले पेट्रोल-डिझेलचे दर

रविवारी आणि सोमवारी किंमतीं थोड्या स्थिरावल्या असल्यामुळे ग्राहकांना दिलासा होता. पण आज पुन्हा इंधन दरवाढ झाल्याचं समोर आलं आहे.

Petrol Diesel Price Today: पुन्हा एकदा इंधनाचा भडका, वाचा तुमच्या शहरातले पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेल
| Edited By: | Updated on: Feb 23, 2021 | 7:13 AM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 23 February) सातत्याने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये तर वाढत्या किंमतींनी 100 चा आकडा पार केला आहे. रविवारी आणि सोमवारी किंमतीं थोड्या स्थिरावल्या असल्यामुळे ग्राहकांना दिलासा होता. पण आज पुन्हा इंधन दरवाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये 35 पैशांनी वाढ झाली आहे. (petrol diesel price hike today by 35 paisa here is the new rates of all city mumbai delhi)

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price hike today by 35 paisa here is the new rates of all city mumbai delhi)

संबंधित बातम्या – 

बँकिंग क्षेत्रासाठी चांगली बातमी; इंडिया रेटिंग्सने आऊटलूकला केलं ‘Stable’

Gold Rate Today: शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने-चांदी महागले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?

‘या’ बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; MCLR मध्ये कपात, गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होणार

(petrol diesel price hike today by 35 paisa here is the new rates of all city mumbai delhi)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!