Fact Check : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत सरकारकडून नोकरी अन् लॅपटॉप; जाणून घ्या…या दाव्यातील तथ्य

जाहिरात पूर्णपणे बनावट असून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. माध्यम संबंधित व्यवहारांची पाहणी करणाऱ्या पीआयबी संस्थेने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जाहिरातीची पडताळणी केली आहे. पीआयबीनं तथ्य शोधन (PIB FACT CHECKER) (फॅक्ट चेकिंग) मोहीम हाती घेतली आहे.

Fact Check : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत सरकारकडून नोकरी अन् लॅपटॉप; जाणून घ्या...या दाव्यातील तथ्य
बेटी बचाओ, बेटी पढाओ
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 27, 2022 | 6:16 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक जाहिरात सर्वाधिक व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ अभियानाशी संबंधित जाहिरातीवरुन मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या जाहिरातीत सरकारद्वारे योजनेच्या अर्जदारांना नोकरी, लॅपटॉप आणि मोबाईल (Mobile) देण्याचा दावा करण्यात आला आहे. योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना 60 हजार रुपये प्रति महिन्यासह लॅपटॉप, मोबाईल मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या (CENTRAL GOVERNMENT) सूत्रांनी जाहिरात फेटाळली आहे. जाहिरात पूर्णपणे बनावट असून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. माध्यम संबंधित व्यवहारांची पाहणी करणाऱ्या पीआयबी संस्थेने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जाहिरातीची पडताळणी केली आहे. पीआयबीनं तथ्य शोधन (PIB FACT CHECKER) (फॅक्ट चेकिंग) मोहीम हाती घेतली आहे.

..तरतूदच नाही:

पीआयबीनं फॅक्ट चेकचे नावे स्वतंत्र ट्विटर हँडल देखील सुरू केले आहे. या ट्विटर हँडलच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान अंतर्गत दावा करण्यात येत असलेल्या नोकरी, लॅपटॉप, मोबाईल अन्य बाबी पूर्णपणे खोट्या आहेत. या योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरुपात निधी वर्ग करण्याची कोणत्याही प्रकारची तरतूद नाही.

..रेल्वेत बंपर भरती:

सोशल मीडियावर रेल्वे भरती संबंधित जाहिरात देखील व्हायरल होत आहे. यामध्ये संगणक आधारित चाचणी व त्यानंतर मेरीटनुसार भरती करण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय रेल्वे मंडळाच्या सूत्रांनी व्हायरल मेसेजची सत्यता नाकारली आहे. रेल्वे सेवेसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी रेल्वे संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा. सोशल मीडियावरुन व्हायरल होणाऱ्या गोष्टींकडे उमेदवारांनी दुर्लक्ष करावे.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

इतर बातम्या :

SHARE MARKET: घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 537 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खाली

LIC IPO : अखेर एलआयसी आयपीओ जाहीर; जाणून घ्या एलआयसी आयपीओबाबत सर्व काही एका क्लीकवर

Today gold-silver rate : सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें