AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Textile Letter Viral | “आम्हाला आनंद होत आहे की, आमच्या प्रमोटर्सचे निधन झाले”, कॉपी पेस्टरच्या अक्कलशुन्यतेला आता काय म्हणावे

Textile Letter Viral | राजस्थानमधील AK Spintex या कंपनीने कॉपी पेस्टचा अत्यंत वाहयात नमुना पेश केला आहे. या कंपनीच्या प्रवर्तकाचे (Promoters) निधन झालेले असताना, जून्याच लेटरवर फक्त एक ओळ जास्तीची जोडून वेळ मारुन नेणे अंगलट आले आहे.

Textile Letter Viral | आम्हाला आनंद होत आहे की, आमच्या प्रमोटर्सचे निधन झाले, कॉपी पेस्टरच्या अक्कलशुन्यतेला आता काय म्हणावे
व्हायरल लेटरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 28, 2022 | 7:17 PM
Share

Textile Letter Viral | AK Spintex या राजस्थानच्या कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला लिहिलेल्या पत्रात, “आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की आमच्या कंपनीच्या प्रवर्तक श्रीमती सरोज देवी छाबरा, ज्यांचे कंपनीत 4,41,000 समभाग (8.76%) शेअर्स आहेत, आता त्या या जगात नाहीत.’असे लिहिले आहे. या कंपनीने कॉपी पेस्टचा अत्यंत वाहयात नमुना पेश केला आहे. या कंपनीच्या प्रवर्तकाचे (Promoters) निधन झालेले असताना, जून्याच लेटरवर फक्त एक ओळ जास्तीची जोडून वेळ मारुन नेणे अंगलट आले आहे. कॉर्पोरेट फाईलिंग (Corporate Filling) दरम्यान ही गंभीर चूक लक्षात आली आहे. कंपनीचे हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने कंपनीची नाचक्की झाली आहे. या पत्रावर लोकांच्या तिखीट आणि मिश्किल प्रतिक्रिया येत आहेत. कॉपी पेस्टर धन्य असल्याची प्रतिक्रिया ही उमटली आहे.

काय हा कोडगेपणा

एवढी वाईट बातमी पण कंपनीच्या सेक्रेटरीमुळे या बातमीतील गांभीर्य हरवले आहे. मागील पत्राचं कॉपी पेस्ट करुन त्यात त्यांच्या निधनाची ओळ जास्तीची घालण्यात आली. पण असे करताना पत्राचा सुरुवातीचा मजकूरही तपासण्याची तसदी सेक्रेटरीने घेतली नाही. त्यामुळे कंपनीचा बाजारात आणि समाज माध्यमात पाणउतारा होत आहे.  व्हायरल मॅसेजवरच चुका अधोरेखीत करण्यात आल्या आहेत.

शेअर बाजाराला दिले पत्र

AK Spintex ही कंपनी कपड्याचे उत्पादन करते. कंपनीने त्यांच्या प्रवर्तक सरोज देवी छाबरा यांच्या निधनाची माहिती मुंबई शेअर बाजाराला कळवली. त्यासंबंधीचे पत्र 25 ऑगस्ट रोजी मुंबई शेअर बाजाराला पाठवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला लिहिलेल्या पत्रात, ‘आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की आमच्या कंपनीच्या प्रवर्तक श्रीमती सरोज देवी छाबरा, ज्यांचे कंपनीत 4,41,000 शेअर्स (8.76%) शेअर्स आहेत. त्या या जगात नाहीत’, असा मजकूर लिहिला आहे. ही माहिती रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती शेअर बाजाराला कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.

या पत्रावर कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी आशिष बागरेचा यांची स्वाक्षरी आहे. हे पत्र सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी सचिवांच्या या चुकीबद्दल चांगलेच फटकारले. सचिव समाज माध्यमावर ट्रोल झाले. कॉपी पेस्ट करताना बुद्धीचा तर वापर करावा असा टोला ही काहींनी लगावला. या कंपनीच्या गुंतवणूकदारांना उद्देशून त्यांनी कंपनीच्या या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले आहेत. तर काहींनी छोट्या कामचुकारपणामुळे अर्थाचा कसा अनर्थ झाला यावर बोट ठेवले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.