पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना खास गिफ्ट; लाँच करणार रिटेल डायरेक्‍ट स्‍कीम

SEBI | रिटेल डायरेक्ट स्कीमच्या पोर्टलवरुन सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल, स्टेट डेव्हलपमेंट लोन आणि सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. ही एक मोठी आर्थिक सुधारणा असल्याची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना खास गिफ्ट; लाँच करणार रिटेल डायरेक्‍ट स्‍कीम
PM Modi

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने सुरु झालेल्या रिटेल डायरेक्ट स्कीम आणि एकात्मिक लोकपाल योजनेचे (Integrated Ombudsman scheme) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे आता सामान्य गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करता येईल. रिटेल डायरेक्ट योजनेचे अकाऊंट विनामूल्य उघडता येईल.

रिटेल डायरेक्ट स्कीमच्या पोर्टलवरुन सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल, स्टेट डेव्हलपमेंट लोन आणि सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. ही एक मोठी आर्थिक सुधारणा असल्याची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

RBI रिटेल डायरेक्ट योजना यावर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी सिक्युरिटीज मार्केटमध्ये – प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही – सुलभ प्रवेश प्रदान करणे हा उद्देश आहे. किरकोळ गुंतवणूकदार त्यांचे गिल्ड सिक्युरिटीज खाते (रिटेल डायरेक्ट) RBI कडे देखील उघडू शकतात.

एकात्मिक लोकपाल योजना

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेचा शुभारंभ करतील. यातून वन नेशन वन लोकपाल ही संकल्पना साकार होईल, तीही एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता. एका पोर्टलवर ग्राहक तक्रारी नोंदवू शकतील, कागदपत्रे सबमिट करू शकतील, स्टेटस ट्रॅक करू शकतील आणि फीडबॅक देऊ शकतील. एकात्मिक लोकपाल योजना ही RBI द्वारे नियमन केलेल्या संस्थांविरुद्धच्या तक्रारींसाठी एकात्मिक योजना आहे. तक्रारी दाखल करण्यात आणि तक्रार निवारणाबाबत माहिती देण्यासाठी RBI बहुभाषिक टोल-फ्री नंबर देखील जारी करेल.

सेबीकडून नियमात महत्त्वाचा बदल

सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडून सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड (सिल्व्हर ईटीएफ) साठीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. सिल्व्हर ईटीएफ ही अशी म्युच्युअल फंड योजना आहे की, ज्यामध्ये गुंतवणूक प्रामुख्याने चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये केली जाते. SEBI ने म्हटले आहे की जर म्युच्युअल फंड योजना कोणत्याही एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये गुंतवणूक करत असेल तर ती अंडरलाइंग गुडस् म्हणजेच फिजिकल सेटलमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवू शकते.

सिल्व्हर ईटीएफ स्कीममध्ये, प्रत्यक्ष चांदी किंवा चांदीशी संबंधित साधन सेबीच्या नोंदणीकृत कस्टोडियनकडे जमा करावे लागते. सिल्व्हर ईटीएफ योजनेत गुंतवणूक करताना काही अटी असतात. जर एखाद्याने चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक केली, तर तो निधी फक्त चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये वापरला जाईल. म्युच्युअल फंड कंपनी हा निधी बँकेत जमा करून अल्पावधीत वापरू शकते.

संबंधित बातम्या:

पंतप्रधान मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अदानींचा पुढाकार; 5 लाख कोटींचा मेगाप्लॅन प्रत्यक्षात कसा उतरवणार?

भारतीय उत्पादनांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी सरकारचा खास प्लॅन, पियूष गोयल म्हणाले…

5G Spectrum Auction: 5G स्पेक्ट्रमचा कधी लिलाव होणार, दूरसंचार मंत्री म्हणाले…


Published On - 10:54 am, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI