PNB बँकेच्या ‘या’ सुविधेमुळे पैसे राहणार सुरक्षित, ATM कार्डच्या वापराबद्दल लाँच केले नवे फिचर

बँकेने ग्राहकांना त्यांचे एटीएम कार्ड (ATM Card) बंद किंवा चालू करण्यासाठीचे नवे फिचर लाॅन्च केले आहे. (PNB bank ATM card)

PNB बँकेच्या 'या' सुविधेमुळे पैसे राहणार सुरक्षित, ATM कार्डच्या वापराबद्दल लाँच केले नवे फिचर
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 12:57 PM

मुंबई : बँकांचे अर्थकारण कोडमडल्यामुळे देशातील अनेक बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. तर काही बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. असे असले तरी देशातील अनेक बँका आपल्या ग्राहांकाच्या उत्तम सेवेसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत. तर काही बँका तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देत आहेत. अशीच एक सुविधा पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना दिली आहे. बँकेने ग्राहकांना त्यांचे एटीएम कार्ड (ATM Card) बंद किंवा चालू करण्यासाठीचे नवे फिचर लाँच केले आहे. पीएनबीच्या बँकेच्या अ‌ॅपद्वारे या नव्या सुविधेचा लाभ घेता येईल. (PNB banks new feature for turning ATM card on or off)

काय आहे बँकेचे नवे फिचर

पंजाब नॅशल बँकेने ग्राहकांना एटीएम कार्ड बंद किंवा चालू करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. एटीएम कार्ड बंद करायचे असल्यास पूर्वी बँकेत जावे लागायचे. आता मात्र, बँकेच्या PNBOne या अ‌ॅपवरुन ग्राहकांना त्याचे एटीएम कार्ड बंद करता येणार आहे. ग्राहक या अ‌ॅपद्वारे एटीएम चालू किंवा बंद करु शकतात. जेव्हा ग्राहक त्यांच्या कार्डचा वापर करत नसतील तेव्हा या कार्डला तात्पुरत्या स्वरुपात बंद करता येऊ शकते. तसेच, कार्ड वापरायचे असेल तर याच अ‌ॅपद्वारे एटीएम कार्ड अ‌ॅक्टिव्ह केले जाऊ शकते. https://tinyurl.com/y8ygdjw4 या वेबसाईटवर बँकेने या सुविधेबाबत अधिकची माहिती दिली आहे.

एटीएम कार्ड बंद किंवा चालू कसे कराल?

सर्वप्रथम पंजाब नॅशनल बँकेचे PNBOne नावाचे अ‌ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल >> त्यांनतर अ‌ॅपला सुरु करण्यासाठी स्व:तचे रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुमचा चालू मोबाईल नंबर वापरा >> PNBOne अ‌ॅपमध्ये लॉगीन करा. त्यांनर डेबिट कार्डच्या ऑप्शनवर जा >> क्वीक ऑन/ ऑफच्या ऑप्शनवर क्लिक करा >> या पर्यायाचा उपयोग करुन ग्राहक त्यांच्या डेबिट कार्डला तात्पुरत्या स्वरुपात चालू किंवा बंद करु शकतात

संबंधित बातम्या :

भांडवली बाजारात मोठी उलाढाल, गुंतवणूकदारांना 1.54 लाख कोटींचा फायदा

ITR फाईल केल्यानंतर ‘हे’ काम करायला विसरु नका, अन्यथा आयकर विभाग करेल कारवाई

स्वस्तात सोने खरेदी करायचंय, केंद्र सरकार देतंय या वर्षातली शेवटची संधी…!

(PNB banks new feature for turning ATM card on or off)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.