स्वस्तात सोने खरेदी करायचंय, केंद्र सरकार देतंय या वर्षातली शेवटची संधी…!

नवीन वर्षाच्या तोंडावर तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर स्वस्तात सोने खरेदी करण्याची या वर्षातली शेवटची संधी केंद्र सरकार देत आहे.

स्वस्तात सोने खरेदी करायचंय, केंद्र सरकार देतंय या वर्षातली शेवटची संधी...!

नवी दिल्ली :  नवीन वर्षाच्या तोंडावर तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर स्वस्तात सोने खरेदी करण्याची या वर्षातली शेवटची संधी केंद्र सरकार देत आहे. कारण सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम अंतर्गत 9 व्या सिरीजचं सबस्क्रिप्शन आजपासून सुरु होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या योजनेअंतर्गत सोने खरेदी करण्याचा दर प्रति ग्रॅम 5 हजार रुपये इतका ठेवला आहे. आज सोन्याच्या दर पाहिला तर तो 51 हजारांच्याही पुढे आहे. त्यामुळे सरकारच्या योजनेअंतर्गत स्वस्त दरात सोने खरेदी करता येऊ शकते. (Central Goverment gold bond Scheme)

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये म्हणजेच 10 ग्रॅमसाठी (1 तोळा) 500 रुपये सूट मिळणार आहे. दुकानात जर सोने खरेदी केली तर ग्राहकांना कोणतीही सूट मिळत नाही. मात्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँडच्या अंतर्गत ऑनलाईन खरेदी केली तर प्रति 10 ग्रॅमसाठी 500 रुपयांची सूट मिळणार आहे.

भारत सरकारची ही योजना काय आहे…??

भारत सरकारच्या वतीने, रिझर्व्ह बॅंक प्रत्येक वर्षी सोने खरेदीचे समतुल्य मानले जाणारे सोन्याचे बंधपत्र (Gold Bond) जारी करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारकडून आपण कमी किमतीला सोने खरेदी करतो. परंतु सरकार सोन्याऐवजी आपल्याला तेवढ्याच किमतीचे रोखे देते (Gold bond) . या योजनेत आपण कमीत कमीत आठ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. यानंतर गुंतवणूक केलेले पैसे आपल्याला एकाच वेळी मिळतात. वास्तविक सोन्याच्या मागणीला कमी करुन ती गुंतवणूक रोख्यांमध्ये करणं, यापाठीमागचा उद्देश आहे.

कोण किती गु्ंतणूक करु शकतो..??

या योजनेअंतर्गत सोने खरेदी करण्याला एक विशिष्ट लिमीट ठेवलेली आहे. आपल्याला या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी एक ग्रॅम सोने खरेदी करावं लागेल. तसंच जास्तीत जास्त आपण 4 किलो सोने खरेदी करु शकता. आपण आपल्या मुलांच्या नावाने देखील या योजनेत गुंतवणूक करु शकतो. तर संस्था किंवा ट्र्स्ट एका वर्षी 20 किलो सोने खरेदी करु शकतात.

बाजाराच्या किमतीपेक्षा स्वस्त सोने

या योजनेअंतर्गत सध्याची सोन्याची किंमत 5 हजार रुपये प्रति ग्रॅम केलेली आहे. सध्याची सोन्याची बाजारातील किंमत 10 ग्रॅमसाठी 51 हजार 785 रुपये एवढी आहे. यावरुन या योजनेतून सोने खरेदी करणं फायदेशीर असल्याचं दिसून येतं.

(Central Goverment Sovereign gold Bond Scheme)

हे ही वाचा

Alert ! जानेवारी महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा; हमखास पैसे होतील दुप्पट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI