PNB Doorstep Banking: आता पैसे काढण्यासाठी ATM मध्येही जाण्याची गरज नाही, बँक पैसे घरीच पाठवणार

PNB Bank | या सुविधेमुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी अगदी ATM मध्येही जाण्याची गरज नाही. बँकेचाच एक कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे देईल.

PNB Doorstep Banking: आता पैसे काढण्यासाठी ATM मध्येही जाण्याची गरज नाही, बँक पैसे घरीच पाठवणार
पंजाब नॅशनल बँक
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 7:17 AM

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी ग्राहकांना अनेक नव्या ऑनलाईन आणि डिजिटल सुविधा देऊ केल्या आहेत. जेणेकरून कोरोनाकाळात त्यांना बँकेत खेटे मारावे लागणार नाहीत. मात्र, पंजाब नॅशनल बँकेने यापुढे जात ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने Doorstep Banking सेवा सुरु केली आहे. देशातील अनेक बँकांनी यापूर्वीच ही सुविधा सुरु केली आहे.

या सुविधेमुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी अगदी ATM मध्येही जाण्याची गरज नाही. बँकेचाच एक कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे देईल. याशिवाय, चेक जमा करण्यासाठी किंवा अन्य सोपस्कार पार पाडण्यासाठीही बँकेचा कर्मचारी तुमच्या घरी येईल. ही सेवा सशुल्क असली तरी त्यासाठी फार कमी पैसे द्यावे लागतील. डोअरस्टेप बँकिंग सुविधेत तुम्ही कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकता. एका व्यवहारासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

ही सुविधा तुम्हाला कशी मिळेल?

डोअरस्टेप बँकिंगचा लाभ उठवण्यासाठी तुम्हाला बँकेत केवायएसी जमा करावे लागतील. बँकेच्या नेहमीच्या कार्यालयीन वेळेतच तुम्हाला या सेवेचा लाभ उठवता येईल. ही सेवा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा बँकेचा दावा आहे. या सुविधेची अधित माहिती मिळवण्यासाठी 1800 10 37 188 या टोल फ्री क्रमांकावर फोन करता येईल. याशिवाय, तुम्ही https://www.psbdsb.in/ या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकता.

संबंधित बातम्या:

पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीवरील व्याज दर बदलले, फटाफट वाचा नवे दर

Fixed Deposit : नवीन वर्षात करा सुरक्षित गुंतवणूक, या 5 बँकाकडून FD वर सर्वाधिक व्याज

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.