PNB स्वस्तात विकतेय 13598 घरे, दुकाने आणि शेतजमीन, जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया

या लिलावात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि शेतीसह सर्व प्रकारच्या मालमत्तेचा लिलाव बँकेद्वारे केला जाणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही मालमत्तेसाठी बोली लावू शकता.

PNB स्वस्तात विकतेय 13598 घरे, दुकाने आणि शेतजमीन, जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया
पंजाब नॅशनल बँक

नवी दिल्ली: जर तुम्हीही स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर देशाची सरकारी बँक पीएनबी (Punjab National Bank) तुम्हाला ही खास संधी देत ​​आहे. पंजाब नॅशनल बँक तुम्हाला 12 ऑगस्ट रोजी स्वस्त घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत ​​आहे. पंजाब नॅशनल बँक मेगा ई-ऑक्शन आयोजित करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्त घरासाठी बोली लावू शकता. या लिलावात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि शेतीसह सर्व प्रकारच्या मालमत्तेचा लिलाव बँकेद्वारे केला जाणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही मालमत्तेसाठी बोली लावू शकता.

पीएनबीने केले ट्विट

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली. बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे की, पीएनबीने स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करण्याची उत्तम संधी आपल्यासाठी आणलीय. पीएनबीच्या सुपर मेगा ई-लिलाव योजनेंतर्गत निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता खरेदी करा. हा लिलाव 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. पीएनबीने आपल्या ट्विटरवर एका व्हिडीओद्वारे याबाबत माहिती दिली.

>>निवासी मालमत्ता – 13598
>> व्यावसायिक मालमत्ता – 3045
>> औद्योगिक मालमत्ता – 1558
>> कृषी मालमत्ता – 104

नोंदणी कशी करावी?

जर तुम्हाला मालमत्तेसाठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp या लिंकवर जावे लागेल. याशिवाय लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://ibapi.in/ ही लिंक तपासू शकता.

बोली लावणाऱ्यांना ‘या’ अटी आधी पूर्ण कराव्या लागतील

>> बोली लावणाऱ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल-आयडी वापरून ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी.
>> त्यानंतर बोलीदारांनी आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करावीत. KYC दस्तऐवजाची ई-लिलाव सेवा प्रदात्याकडून पडताळणी केली जाणार आहे. याला किमान दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात.
>> यानंतर तुम्हाला ई-ऑक्शन प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या चालानचा वापर करून रक्कम हस्तांतरित करावी लागेल. आपण NEFT/हस्तांतरण किंवा ऑनलाईन/ऑफलाईन हस्तांतरण वापरू शकता.
>> इच्छुक नोंदणीकृत बोलीधारक प्रथम, द्वितीय आणि तृतीय टप्पा पूर्ण केल्यानंतर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात.

बँक वेळोवेळी लिलाव करते

मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली नाही. ते काही कारणास्तव पैसे देऊ शकले नाहीत, त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांनी ताब्यात घेतल्यात. अशा मालमत्तांचा वेळोवेळी बँकांकडून लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते. लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये हे फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड, स्थान, मालमत्तेचे मापन यासह इतर माहिती देखील देते. जर तुम्हाला ई-लिलावाद्वारे मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित मालमत्तेविषयी कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकता.

संबंधित बातम्या

‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीत कंपन्या स्त्रियांना देतायत जास्त पगार, पॅकेजमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढ

स्मार्ट सेव्हिंग: अशा प्रकारे वैयक्तिक कर्जावरील व्याज करा कमी, कर्ज घेण्यापूर्वी 4 टिप्स जाणून घ्या

PNB sells cheap 13598 houses, shops and farmland, Learn the buying process

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI