AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Scheme : तुमचे पैसे राहणार सुरक्षित आणि मिळणार भरमसाठ व्याज, पोस्टाच्या ‘या’ 5 भारी योजना

पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुलं आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना चालवल्या जातात. यामध्ये अशा 5 योजना आहेत, ज्यांच्याद्वारे तुम्ही चांगलं व्याज मिळवू शकता. अनेक जण अशी जागा शोधत असतात जिथे त्यांचा पैसा सुरक्षित राहील आणि पैशाला व्याज मिळेल. मात्र आज आम्ही अशाच 5 योजना तुम्हाला सांगत आहोत.

Post Office Scheme : तुमचे पैसे राहणार सुरक्षित आणि मिळणार भरमसाठ व्याज, पोस्टाच्या 'या' 5 भारी योजना
पोस्ट ऑफिसच्या 5 भारी योजना
| Updated on: May 12, 2024 | 5:57 PM
Share

आपण आपल्या भविष्यासाठी पैशांची बचत करतो. आपलं भविष्य सुखकर व्हावं, अडचणीच्या काळात कुणाकडे पैशांसाठी हात पसरायला लागू नये यासाठी आपण पैशांची बचत करतो. याशिवाय आयुष्य जगण्यासाठी पैसे हे फार महत्त्वाचे आहेत. सर्व सोंग करता येतात, पण पैशांचं सोंग कधीच करता येत नाही. त्यामुळे आपल्याजवळ पैसे असणं आवश्यक आहेत. त्यामुळे आपण दर महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे भविष्यासाठी सेविंग करुन ठेवतो. आपण बऱ्याचदा असा साठवून ठेवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो. पण आपण गुंतवलेला पैसा सुरक्षित राहील ना, तसेच चांगला मोबदला मिळेल ना? असा विचार आपण करत असतो. तुम्ही पैशांची गुंतवणूक कुठे करावी? असा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस एक चांगलं माध्यम आहे. आम्ही तुम्हाला पोस्टाच्या काही योजनांची माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्हाला चांगला मोबदला मिळू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुलं आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना चालवल्या जातात. यामध्ये अशा 5 योजना आहेत, ज्यांच्याद्वारे तुम्ही चांगलं व्याज मिळवू शकता. अनेक जण अशी जागा शोधत असतात जिथे त्यांचा पैसा सुरक्षित राहील आणि पैशाला व्याज मिळेल. मात्र आज आम्ही अशाच 5 योजना तुम्हाला सांगत आहोत.

किसान विकास पत्र

किसान विकास पत्रामध्ये जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. विशेष म्हणजे तुमचे पैसे 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्ष आणि 7 महिन्यांत दुप्पट होतील. किसान विकास पत्र योजनेंतर्गत 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणतीही प्रौढ व्यक्ती खाते उघडू शकते. तर अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने त्याचे पालक खाते उघडू शकतात.

नॅशनल सेविंग टाईम डिपॉजिट अकाउंट

या योजनेच्या माध्यमातूनही तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता. या योजनेतूनही तुम्ही चांगल्या व्याजाची परतफेड मिळवू शकता. या योजने अंतर्गत एका वर्षाला 6.9 टक्के, दोन वर्षासाठी 7 टक्के, तीन वर्षासाठी 7.1 आणि पाच वर्षासाठी 7.5 टक्के व्याजदराने पैशांची गुंतवणूक केली जाऊ शकते. गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1 हजार रुपये इतकी आहे. या योजनेतून गुंतवलेले पैसे सहा महिन्यांच्याआधी काढता येणार नाहीत. याशिवाय एक वर्षाच्या आधी पैसे काढल्यास साध्या सेविंग अकाउंटला जे व्याज मिळतं तितकंच व्याज मिळतं.

वरिष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकार प्रणित बचत योजना आहे. योजनेअंतर्गत खाते पोस्ट ऑफिस किंवा शेड्युल कमर्शियल बँकेत उघडता येते. 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती किंवा 55 वर्ष किंवा त्याहून अधिक पण 60 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती आणि जो सेवानिवृत्तीच्या तारखेला निवृत्त झाला अशा व्यक्ती खाते उघडण्यास पात्र आहेत. किमान 1000 आणि कमाल 30 लाख रुपये ठेवून खाते उघडता येते. एकल किंवा संयुक्त खाते म्हणून उघडता येते. SCSS दरवर्षी ८.२ टक्के व्याजदर देते. महागाई बाजार परिस्थिती आणि इतर घटक लक्षात घेऊन अंतिम दर निश्चित केला जातो. जेष्ठ नागरिक बचत योजनेचा कार्यकाळ पाच वर्षाचा आहे. आणि तो वाढवताही येतो.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला सध्या ७.७ टक्के व्याज दिले जाते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या योजनेत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला सूट देण्यात आली आहे. एनएससी अंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसच्या ब्रँचमध्ये खाते उघडलं जाऊ शकते.

पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF)

पब्लिक प्रॉविडेंट फंड योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम 500 रुपये आहे. त्याचबरोबर या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. 15 वर्षाच्या गुंत.वणुकीनंतर तुम्हाला 5 वर्षासाठी ही गुंतवणूक वाढवण्यासाठी संधी मिळते. पीपीएफमध्ये तुम्हाला आयकर कलम 80 C अंतर्गत कर लाभ देखील मिळतात. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही पीपीएफमधून पैसे काढू शकता. पीपीएफ शिल्लक रकमेवरही तुम्ही कर्ज घेऊ शकता.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.