Post Office Scheme : दररोज 95 रुपये वाचवून 14 लाख मिळवा, ‘या’ फायद्यांसाठी गुंतवणुकीच्या टीप्स

पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात. पोस्टाच्या अनेक योजना प्रसिद्ध आहेत.

Post Office Scheme : दररोज 95 रुपये वाचवून 14 लाख मिळवा, 'या' फायद्यांसाठी गुंतवणुकीच्या टीप्स
गॅरंटीने दुप्पट पैसे मिळवून देणारी पोस्टाची योजना
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:35 PM

मुंबई : पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात. पोस्टाच्या अनेक योजना प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा फायद्याची आहे. या योजनेत दररोज फक्त 95 रुपयांची बचत केली तरी 14 लाख रुपये मिळू शकतात. विशेष म्हणजे या योजनेत पॉलिसी होल्डर जीवंत असल्यास मनी बॅकचाही फायदा मिळतो. म्हणजेच जितकी गुंतवणूक केली ती परत मिळते (Post office scheme daily 95 rupees and get 14 lakh after maturity).

ग्राम सुमंगल योजनेत लाभार्थ्यांना मॅच्युरिटीवर बोनसही मिळतो. ही योजना 2 कालावधीसाठी मिळते. पहिली 15 वर्षे आणि दुसरी 20 वर्षे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी वय 19 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे आहे.

योजनेचे फायदे

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन वीमा योजनेत मनी बॅकची सुविधा आहे. यात खातेधारकाला जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचा सम अश्युर्ड मिळतो. जर पॉलिसीधारक योजनेच्या मॅच्युरिटीपर्यंत जीवंत राहिल्यास मनी बॅकचा लाभ मिळतो. हा लाभ तीन वेळा मिळतो. 15 वर्षांच्या पॉलिसीत 6 व्या वर्षी, 9 व्या आणि 12 व्या वर्षी 20-20 टक्के पैसे मिळतात. मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित 40 टक्के पैसे मिळतात.

20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 8 व्या, 12 व्या आणि 16 व्या वर्षी मनी बॅक स्वरुपात 20-20 टक्के पैसे मिळतात. उर्वरित 40 टक्के पैसे मॅच्युरिटीनंतर मिळतात. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला योजनेच्या रकमेसह बोनस दिला जातो.

किती हप्ता भरावा लागतो?

जर 25 वर्षांचा व्यक्ती 7 लाख रुपयांच्या सम अश्युर्डसह 20 वर्षांची पॉलिसी घेत असेल तर त्याला दर महिन्याला 2853 रुपये हप्ता द्यावा लागेल. म्हणजेच दररोज 95 रुपये जमा करावे लागतील. याप्रमाणे वार्षिक हप्ता 32,735 रुपये होतो. जर 6 महिन्याला द्यायचे असेल तर 16,715 रुपये आणि तीन महिन्यासाठी 8,449 रुपये भरावे लागतात.

योजनेचा लाभ कसा मिळणार?

पॉलिसी 20 वर्षांची असेल तर 8 व्या, 12 व्या आणि 16 व्या वर्षी 20-20 टक्के हिशोबाने प्रत्येकी 1.4 लाख रुपये मिळतील. 20 व्या वर्षी 2.8 लाख रुपयांची सम अश्युर्ड रक्कम मिळेल. याशिवाय 48 रुपए प्रति हजार वार्षिक बोनस यात समाविष्ट होईल. त्याप्रमाणे वार्षिक बोनस 33,600 रुपये होईल. 20 वर्षांमध्ये बोनसची ही रक्कम 6.72 लाख रुपये होईल. अशाप्रकारे विमा धारकाला एकूण 13.72 लाख रुपयांचा फायदा होईल.

हेही वाचा :

पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्या

PHOTO | पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच होईल लाखोंची कमाई

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांनंतर 10 लाख रुपये मिळणार

व्हिडीओ पाहा :

Post office scheme daily 95 rupees and get 14 lakh after maturity

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.