PPF, सुकन्या समृद्धीसह पोस्ट ऑफिस योजनेतील नियमात मोठे बदल, जबरदस्त सवलती

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजने(SSY)सह अन्य पोस्टल सेव्हिंग्स स्कीम्स (Postal Savings Schemes) गुंतवणूक करणं सहजसोपं झालं आहे.

PPF, सुकन्या समृद्धीसह पोस्ट ऑफिस योजनेतील नियमात मोठे बदल, जबरदस्त सवलती
या योजनेत नाव नोंदण्यासाठी पीओएमआयएसचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला ओळखपत्र, निवासी पुरावा, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असणार आहेत.
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 11:12 AM

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट ऑफिसने (Department of Post) ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजनेसह (SSY) अन्य पोस्टल सेव्हिंग्ज स्कीम्समध्ये (Postal Savings Schemes) गुंतवणूक करणं सहज-सोपं केलं आहे. भारतीय पोस्ट ऑफिस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक सेवक (GDS – Gramin Dak Sevak) विभागांत चेकची सुविधा नाही. त्यामुळे विड्रॉल फॉर्म (SB-7)च्या माध्यमातून डिपॉझिट आणि अकाऊंट उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. (PPF SSY and other postal savings schemes deposit rules changed) करता येणार 5,000 रुपयांपर्यंत डिपॉझिट भारतीय पोस्ट ऑफिसच्या या निर्णयानंतर ग्रामीण डाक सेवक विभागात आगामी डिपॉझिट आणि नवं खातं उघडण्यासाठी विड्रॉल फॉर्म (SB-7)बरोबर सेव्हिंग्स बुक असलेल्या पासबुकवर काम चालवावं लागणार आहे. या फॉर्मबरोबर 5000 रुपयांपर्यंत डिपॉझिट करता येणार आहे. हा नियम 5000 रुपयांपासून नव्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाऊंट उघडण्यासाठीही लागू आहे. 5,000 रुपयांहून अधिक डिपॉझिट करण्यासाठी काय करावं लागेल? 5,000 रुपयांहून अधिक डिपॉझिट करण्यासाठी ग्राहकांना विड्रॉल फॉर्म SB-7बरोबर पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बुक पासबुक आणि पे-इन-स्लिपसुद्धा द्यावी लागणार आहे. त्याशिवाय संबंधित योजनेसाठी SB/RD/SSA किंवा PPFचे पासबुकही दाखवावे लागणार आहे. ही कागदपत्रे पोस्ट मास्टरकडून तपासली जातील. यानंतर तुम्हाला अकाऊंट ऑफिसरकडून पासबुक आणि पावती मिळेल. (PPF SSY and other postal savings schemes deposit rules changed)

गेल्या आठवड्यात केंद्राने स्मॉल सेव्हिंग स्कीम्स (Small Savings Schemes) वर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कोणताही बदल न करण्याचं ठरवलं होतं. यामध्ये पीपीएफ, एनएससी याप्रमाणेच अन्य स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचा देखील समावेश आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी या योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. अर्थ मंत्रालयाकडून याबाबत एक अधिसूचनाही जारी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

आर्थिक अडचण असेल तर काळजी सोडा, सोप्या पद्धतीनं काढा PF अकाऊंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे

रोज 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा 14 लाखांचे मालक, जाणून घ्या काय आहे योजना?

(PPF SSY and other postal savings schemes deposit rules changed)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.