ड्रीम कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Car Loan?

आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत की, सर्वात कमी व्याजदरांसह वाहन कर्ज कुठे मिळेल? (lowest interest rates on Car Loans)

ड्रीम कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Car Loan?
Car Loan

मुंबई : कोरोना काळात (Corona Pandemic) वाहन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. नवीन वाहने कमी प्रमाणात खरेदी केली जात आहेत आणि ज्या लोकांकडे आधीपासून कार आहेत, ते लोक आपली कार घेऊन बाहेर पडू शकत नाहीत. परंतु दुसऱ्या बाजूला सध्याच्या परिस्थितीत लोकांकडे खासगी कार असणे आवश्यक झाले आहे. परंतु पुरेसं बजेट नसल्यामुळे किंवा कमी व्याजदरांसह वाहन कर्ज कुठे मिळेल, याबाबतची माहिती नसल्याने अनेक जणांचं कार घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहातं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत की, सर्वात कमी व्याजदरांसह वाहन कर्ज कुठे मिळेल? पंजाब आणि सिंध बँक तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत आहेत. (Punjab and Sind Bank, Central Bank of India offers lowest interest rates on Car Loans)

बँकांविषयी बोलायचे झाल्यास सरकारी बँका खासगी बँकांपेक्षा कमी दराने कर्ज देत आहेत. गृहकर्जाशी तुलना केल्यास हे व्याज कमी असते. जर तुम्ही Bankbazaar.com च्या एका अहवालावर नजर टाकली तर तुम्हाला समजेल की पंजाब आणि सिंध बँक याबाबतीत अव्वल आहे. ही बँक कमी व्याजात वाहन खरेदीसाठी कर्ज देते. सात वर्षांसाठी तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्या पंजाब आणि सिंध बँक 7 टक्के व्याज आकारते. दुसर्‍या क्रमांकावर अजून दोन सरकारी बँका आहेत. सेंट्रल बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँका 7.25% व्याज आकारत आहेत.

कार लोन घेणं योग्य आहे का?

गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्जाशी तुलना केल्यास कार कर्जावर कोणताही कर लाभाचा फायदा होत नाही. तथापि, ते ‘गुड लोन’ या श्रेणीमध्ये ठेवले गेले आहे, कारण ‘एसेट क्रिएशन’ किंवा मालमत्ता निर्मितीस त्यामुळे सुविधा मिळते. हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही एक ‘डिप्रेशिएटिंग अॅसेट’ म्हणजेच हळूहळू संपणारी संपत्ती आहे. म्हणूनच, तज्ज्ञ असं सांगतात की, कार किंवा ऑटो कर्ज फक्त तेव्हाच घ्या जेव्हा ते फार गरजेचं असेल. जर तुम्ही तुमच्याकडे साठवलेल्या पैशांमधून वाहन घेत असाल, तर उत्तम, पण कर्ज घेऊन वाहन घेणं फायद्याचं नाही.

या बँका सर्वात कमी व्याज घेतात

बँकांबाबत बोलायचे झाल्यास, पंजाब आणि सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक या बँका कार कर्जाच्या बाबतीत चांगल्या मानल्या जातात. या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत आणि खासगी बँकांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. लोकांना या बँकांकडून कर्ज घेणं सोयीस्कर वाटतं.

किती टक्के व्याज द्यावं लागेल

कॅनरा बँक 7.30% दराच्या हिशेबाने 15,240 रुपयांच्या ईएमआयवर कर्ज देत आहे. पंजाब नॅशनल बँक 7,30% व्याजदराने 15,240 रुपयांच्या ईएमआयवर कर्ज देत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया 7.40 % व्याज आणि 15,289 रुपयांच्या ईएमआयवर कर्ज देत आहे. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया 7.45%, बँक ऑफ महाराष्ट्र 7.50%, आयडीबीआय बँक 7.50% आणि इंडियन ओव्हरसीज बँक 7.55% दराने कार कर्ज देत आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.67 लाखात

Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा एकदा झालं स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

सावधान! LIC मधले आपले पैसे बुडण्याची शक्यता, पैसे हवे असल्यास आताच करा हे काम

(Car Loan at lowest interest rate, Punjab and Sind Bank, Central Bank of India Takes Minimum Interest)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI