Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या खाली, रुग्णसंख्येत 26 हजारांनी घट

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या खाली, रुग्णसंख्येत 26 हजारांनी घट
Maharashtra Corona Virus 04 june 2021

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 वर गेला आहे. (New Corona India 24 hours)

अनिश बेंद्रे

|

May 25, 2021 | 10:04 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 26 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 96 हजार 427 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 3 हजार 511 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळत आहे. (New 196427 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 511 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 26 हजार 850 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 वर गेला आहे. देशात 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 7 हजार 231 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 25 लाख 86 हजार 782 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,96,427

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,26,850

देशात 24 तासात मृत्यू – 3,511

एकूण रूग्ण – 2,69,48,874

एकूण डिस्चार्ज – 2,40,54,861

एकूण मृत्यू – 3,07,231

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 25,86,782

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,85,38,999 (New Corona India 24 hours)

संबंधित बातम्या :

Corona Virus | कोरोनावरील उपचारांसाठी अँटीबॉडी कॉकटेल, डोसपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या या औषधाबद्दल सर्व काही

Sputnik V लसीची कमतरता संपणार, ‘ही’ कंपनी भारतातच करणार उत्पादन

(New 196427 Corona Cases in India in the last 24 hours)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें