ना मुकेश, ना नीता अंबानी, रिलायन्सचे सर्वाधिक शेअर परिवारातील या महिलेकडे

RIL Holding Pattern: मागील वर्षी कंपनीच्या संचालक मंडळात आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांची एन्ट्री झाली. शेअर धारकांच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता मुकेश अंबानी यांनी तिघं भाऊ-बहिणींमध्ये समान शेअरची वाटणी केली आहे.

ना मुकेश, ना नीता अंबानी, रिलायन्सचे सर्वाधिक शेअर परिवारातील या महिलेकडे
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 2:11 PM

मुंबई | दि. 8 मार्च 2024 :  देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडींग समारंभ नुकताच झाला. त्याची चर्चा देशभर झाली.  रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर मार्केटमध्ये घोडदौड सुरु आहे. गुंतवणूकदरांना या कंपनीने चांगला परतावा दिला आहे. टेलीकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत रिलायन्सचा विस्तार झाला आहे. धीरुभाई अंबानी यांनी सुरु केलेली ही कंपनी भारतातील मोठा उद्योग समूह म्हणून नावरुपाला आली आहे. या कंपनीचे कामकाज मुकेश अंबानी, नीता अंबानी प्रमाणे त्यांची तीन मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी सांभाळत आहेत. या कंपनीचे सर्वाधिक शेअर या पाचही जणांकडे नाही. कंपनीची सर्वात मोठी मालकीन मुकेश अंबानी यांची आई कोकीलाबेन आहेत. त्यांच्याकडेच कंपनीचे सर्वाधिक शेअर आहेत.

तिघं मागील वर्षी संचालक मंडळात

मागील वर्षी कंपनीच्या संचालक मंडळात आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांची एन्ट्री झाली. शेअर धारकांच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता मुकेश अंबानी यांनी तिघं भाऊ-बहिणींमध्ये समान शेअरची वाटणी केली आहे. तसेच त्यांच्याकडे जितके शेअर आहेत, तितके शेअर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे किती शेअर

रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डिसेंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीचे 50.30 टक्के शेअर आहेत. पब्लिक शेअरहोल्डिंग 49.70 टक्के आहे. रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या प्रमोटर्समध्येअंबानी परिवाराचे सहा सदस्य आहेत. त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश, ईशा आणि अनंत अंबानी आहेत. या सर्वांकडे कंपनीचे 80 लाख 52 हजार 21 शेअर आहे.

हे सुद्धा वाचा

कोकिलाबेन यांच्याकडे किती शेअर?

मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्याजवळ कंपनीचे सर्वाधिक शेअर आहेत. त्यांच्याकडे 1 कोटी 57 लाख 41 हजार 322 शेअर आहेत. यामुळे कंपनीत सर्वाधिक त्यांची भागेदारी आहे. कोकिलाबेन रिलायन्स इंडस्‍ट्रीजमध्ये अंबानी परिवारातील सर्वात मोठी शेअरधारक आहेत. तसेच कोकिलाबेन यांच्याकडे जिओ फायन्सनेंशिअल सव्हिसेज लिमिटेडचे मोठी भूमिका आहे.

Non Stop LIVE Update
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.