साखर उद्योगाला दिलासा; 303 मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी

साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी आहे. टीक्यूआर अंतर्गंत अमेरिकेला 303 मेट्रिक टन अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत 'डीजीएफटी'कडून आदेश जारी करण्यात आला आहे.

साखर उद्योगाला दिलासा; 303 मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 10:59 AM

नवी दिल्ली : साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी आहे. टीक्यूआर अंतर्गंत अमेरिकेला 303 मेट्रिक टन अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत ‘डीजीएफटी’कडून आदेश जारी करण्यात आला आहे. ही साखरेची निर्यात करमुक्त असणार आहे. गेल्या ऑक्टोबरपर्यंत भारताने अमेरिकेला 8,424 मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. यामध्ये आणखी आता 303 मेट्रिक टन साखरेची भर पडणार आहे. याचाच अर्थ असा की, येत्या डिसेंबर 2021 पर्यंत भारत अमेरिकेला एकूण 8727मेट्रिक टन साखरेची निर्यात करेल.

साखर कारखान्यांना दिलासा 

दरम्यान देशातील साखरेचे अतिरिक्त उत्पादन निर्यात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फायदा हा साखर उद्योगाला होणार आहे. अतिरिक्त उत्पादनाची निर्यात करण्यात आल्याने मागणी आणि पुरवठा समपातळीवर राहु शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेचे भाव जैसे थे राहातील, त्यामुळे साखर कारखाने आणि ग्राहक दोघांनाही दिलासा मिळेल. एका अहवालानुसार या वर्षी भारतामध्ये ऊसाचे प्रमाण जास्त असल्याने सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

अनेक देशांमध्ये साखरेचा तुटवडा

दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक इंधनाचा शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी उसापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात असल्यामुळे साखरेचे उत्पादन घटले आहे. परिणामी अनेक देशांना इतर देशातून साखर आयात करावी लागत आहे. भारतामध्ये देखील उसापासून काही प्रमाणात इथेनॉल निर्मितीला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वे कात टाकतेय! आता तुम्ही ट्रेनही घेऊ शकता भाड्यानं, रेल्वे मंत्र्यांची भारत गौरवची घोषणा

पीएफ हस्तांतरण झाले सोपे; ‘ईपीएफओ’चा मोठा निर्णय, खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा

एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे; आयुष्यभर दर महिन्याला मिळेल 20 हजारांची पेन्शन

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.