Retirement Planning : सर्वाधिक व्याज तर मिळेलच पण कमाईवर एक टक्काही भरावा नाही लागणार कर, निवृत्तीधारकांना ही योजना फलदायी..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Dec 17, 2022 | 7:54 PM

Retirement Planning : सर्वाधिक व्याजासहीत कराची ही सवलत या योजनेत मिळते..

Retirement Planning : सर्वाधिक व्याज तर मिळेलच पण कमाईवर एक टक्काही भरावा नाही लागणार कर, निवृत्तीधारकांना ही योजना फलदायी..
डबल फायदा
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : या सरकारी योजनेत तुम्हाला सर्वाधिक कमाई तर करताच येते. पण या कमाईवर कुठलाच करही द्यावा लागत नाही. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेव्यतिरिक्त (Employees Provident Fund) सर्वाधिक व्याज देणारी दुसरी सरकारी योजना नाही. परताव्याच्या हमीसह गुंतवणूकही सुरक्षित राहते. या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. अल्प बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) मुदत ठेव असो वा आवर्ती ठेव योजना असो, त्यावर इतके व्याज मिळत नाही. या योजनेवर सर्वाधिक व्याज मिळते.

या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आणि कंपनीकडून योगदान देण्यात येते. सध्या एकूण गुंतवणुकीवर 8.1% व्याज मिळते. दरवर्षी त्यात बदल होतो. गेल्या काही दिवसांपासून व्याजाचा दर सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे कर्मचारी केंद्र सरकारवर नाराज आहेत.

गुंतवणुकीवर मिळणारे व्याज दरवर्षी कम्पाऊंड इंट्रेस्टमध्ये बदलते. म्हणजेच दरवर्षी रक्कमेवर व्याज मिळेल. ते पुन्हा गुंतवणुकीत जमा होईल आणि त्यावर व्याज मिळेल. अनेकदा नोकरदार एक चूक करतात. ते नोकरी बदलली की जमा रक्कम खात्यातून काढून घेतात.

हे सुद्धा वाचा

नोकरी बदलल्यानंतर खाते दुसऱ्या खात्यात विलीन करता येते. जर तुम्ही खात्यातून निवृत्तीची रक्कम काढली तर तुम्हाला व्याजाचा फायदा मिळणार नाही. तसेच वारंवार रक्कम काढल्यामुळे निवृत्तीपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान होईल.

EPFO च्या नियमानुसार, नोकरी दरम्यान EPF काढले नाही तर निवृत्तीनंतर मोठा फायदा मिळतो. निवृत्तीसाठी मोठी रक्कम जमा होते. त्यावर वारंवार कम्पाउंडिंग व्याज (Compound Interest) मिळत असल्याने तुमची रक्कम वाढते. तसेच निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त (Tax Free) असते. पण त्यापूर्वीच रक्कम काढली तर त्यावर कर द्यावा लागतो.

सुरुवातीच्या 9 वर्षे 6 महिन्यांच्या नोकरीदरम्यान तुम्ही रक्कम काढली नाही तर तुम्ही EPS म्हणजे कर्मचारी निवृत्ती योजनेसाठी पात्र ठरता. निवृत्तीनंतर तुम्हाला या योजनेतंर्गत एक ठराविक रक्कम मिळते. या योजनेत तुमचे आणि कंपनीचे योगदान असते. कंपनीकडून या फंडमध्ये 8.33 टक्के रक्कम जमा होते. कर्मचाऱ्याला वयाच्या 58 व्या वर्षानंतर पेन्शन मिळते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI