कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी पहायला मिळत आहे. सोमवारी कच्च्या तेलाचे दर 1.85 टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये  आज कच्च्या तेलाचे दर 71.17 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोल
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 10:36 AM

नवी दिल्ली : (Petrol Diesel Price Today) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी पहायला मिळत आहे. सोमवारी कच्च्या तेलाचे दर 1.85 टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये  आज कच्च्या तेलाचे दर 71.17 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. सध्या जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनचा बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम होत असून,  यातच आता कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जरी वाढ झाली असली, तरी देखील भारतामध्ये पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर आहे.

महिनाभरापासून पेट्रोल, डिझेल स्थिर 

गेल्या महिन्याभरापासून भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्यतंरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. आता किमती वाढल्यानंतर देखील इंधनाचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे. 4 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी पेट्रोलचे दर हे प्रति लिटर मागे 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या 

देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम

…तर तुम्ही अशा पद्धतीनं सोन्याच्या कर्जाची परतफेड करू शकता, RBI चा नियम काय सांगतो?

कॅनरा बँकेत मर्यादित कालावधीची ऑफर सुरू, 6.65% दराने गृहकर्ज, इतर बँकांचे दर काय?

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.