AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज हस्तांतरणाबाबत नियम बदलले, RBI कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

जारी केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मुख्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्ज देणाऱ्या संस्थांना अशा व्यवहारांसाठी संचालक मंडळाच्या मान्यतेसह सर्वसमावेशक धोरण तयार करावे लागेल. आरबीआयने म्हटले आहे की, कर्ज देणाऱ्या संस्था विविध कारणांसाठी कर्ज हस्तांतरणाचा अवलंब करतात.

कर्ज हस्तांतरणाबाबत नियम बदलले, RBI कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 1:45 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज हस्तांतरणासंदर्भात शुक्रवारी एक मास्टर पॉलिसी तयार केली आणि यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. कर्ज हस्तांतरण दोन बँका आणि वित्तीय संस्था यांच्यात होते. कर्ज हस्तांतरणाच्या मदतीने बँका आणि वित्तीय संस्था तरलता (कॅश फंड) व्यवस्थापित करतात, कर्ज एक्सपोजर देखील व्यवस्थापित केले जाते. हे त्यांना त्यांचे ताळेबंद निश्चित करण्यात मदत करते.

संचालक मंडळाच्या मान्यतेसह सर्वसमावेशक धोरण तयार

जारी केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मुख्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्ज देणाऱ्या संस्थांना अशा व्यवहारांसाठी संचालक मंडळाच्या मान्यतेसह सर्वसमावेशक धोरण तयार करावे लागेल. आरबीआयने म्हटले आहे की, कर्ज देणाऱ्या संस्था विविध कारणांसाठी कर्ज हस्तांतरणाचा अवलंब करतात. यामध्ये रोख व्यवस्थापित करणे, त्यांच्या जोखीम किंवा धोरणात्मक विक्रीचे समतोल साधणे समाविष्ट आहे. तसेच कर्जाच्या बाबतीत मजबूत दुय्यम बाजारपेठ तरलता वाढवण्याचे अतिरिक्त मार्ग प्रदान करण्यात मदत करेल.

सर्व वित्तीय संस्थांना नियम लागू होतील

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशातील तरतुदी बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या, नाबार्ड, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB), निर्यात-आयात बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) यासह सर्व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFC) लागू असतील. विविध श्रेणींच्या कर्जासाठी किमान कालावधीसाठी मास्टर निर्देशात तरतूद देखील करण्यात आलीय. त्या कालावधीनंतरच कर्ज एका बँकेकडून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केले जाऊ शकते.

मंडळाच्या मान्यतेने व्यापक धोरण बनवावे लागेल

त्यात म्हटले आहे की, “कर्जदार संस्थांना या मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत कर्ज हस्तांतरण आणि अधिग्रहण करण्यासाठी मंडळाच्या मान्यतेसह सर्वसमावेशक धोरण तयार करावे लागेल.” स्टोरेज आणि डेटा व्यवस्थापन, जोखीम संबंधित किमान परिमाणात्मक आणि गुणात्मक मापदंड निश्चित करण्याची आवश्यकता असेल. व्यवस्थापन, ठराविक कालावधीत बोर्ड स्तरावर देखरेख इत्यादी करता येणार आहे.

नवीन नियम तात्काळ प्रभावाने अंमलात

भारतीय रिझर्व्ह बँक निर्देश (हस्तांतरण) 2021 वरील मसुदा मार्गदर्शक तत्त्वावर गेल्या वर्षी जूनमध्ये विविध भागधारकांच्या टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले. टिप्पण्यांचा विचार केल्यानंतर शुक्रवारी यासंदर्भातील अंतिम सूचना जारी करण्यात आल्या. आरबीआयने म्हटले आहे की, सूचना त्वरित प्रभावाने लागू झाल्यात. कर्जाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सूचनांमध्ये दिलीय. आरबीआयने मानक मालमत्तांच्या सिक्युरिटायझेशनबाबत निर्देश देखील जारी केलेत, जेणेकरून त्यांना विविध प्रकारच्या जोखमीसह व्यवहार्य सिक्युरिटीजमध्ये पुनर्बांधणी करता येईल.

संबंधित बातम्या

अॅमेझॉनकडून द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021 ची घोषणा, ‘या’ दिवसापासून विक्री सुरू

‘या’ 5 बँकांमध्ये बचत खात्यावर 7% पर्यंत व्याज, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Rules regarding loan transfers changed, new guidelines issued by RBI

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.